विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? पाहा वैमानिकाने कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO

विमानातून प्रवास करताना खिडकीच्या शेजारची सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचं कारण खिडकीतून दिसणारं मनमोहक दृश्य पाहण्याचा मोह आवरत नसतो. आपण कितीही मोठे झालो तरी ही एक गोष्ट मात्र आपल्याला बालपणात घेऊन जाते. अनेकदा आपल्याला हे दृश्य पाहिल्यानंतर कॉकपिटमधून किती सुंदर दिसत असेल असंही वाटतं. पण प्रवाशांना तिथे प्रवेश निषिद्ध असल्याने आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. 

Newsweek त्या वृत्तानुसार हा व्हिडीओ टर्कीमधला आहे. वैमानिक Bedrettin Sagdic याने हा व्हिडीओ मूळत: आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. या व्हिडीओ करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत विमान इंस्ताबूल विमानतळावर लँडिग करताना दिसत आहे. दरम्यान विमान लँड होण्याआधी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. Sagdic हे 16 वर्ष हवाई वाहतूक विभागात होते. यानंतर ते वैमानिक झाले. 

व्हिडीओच्या सुरुवातीला आकाशात ढगांची सुंदर चादर पसरलेली दिसत आहे. रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. विमान ढगांमधून मार्ग काढत लँडिग होण्यासाठी खालील बाजूला दिसत आहे. 

ढगांमधून खाली उतरल्यानंतर विमान डाव्या बाजूला वळण घेताच खाली शहर दिसत आहे. यानंतर विमान जेव्हा लँडिंगसाठी जातं, ते पाहताना काळजाचा ठोका चुकतो. 

हेही वाचा :  Optical Illusion : खडकांमध्ये लपलेली गोगलगाय शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ

एक्सवर ही पोस्ट शेअर करण्यात आली असून, ‘रात्री लँडिंग करताना कॉकपिटमधील पायलट व्ह्यू’ अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भारावून जात आहे. 

एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, ‘अंगावर रोमांच उभे करणारी 32 सेकंद’. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, ढगांमधूनही तुम्ही कसं काय पाहू शकता हे आश्चर्य आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …