स्लिवलेस ब्लाऊजमधील तब्बूची सोशल मीडियावर आग, अजय देवगणला मिठी मारत दिल्या किलर पोझ

Ajay Devgan चा बहुप्रतीक्षित ‘Bhola’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मूळ दक्षिणात्य ‘kaithi’ चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘भोला’ चित्रपटची चर्चा भारतभर सुरू आहे. या चित्रपटातून अजय देवगण आणि Tabu ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. अजय आणि तब्बू सुद्धा आपल्या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेत असून अविरतपणे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात बिझी आहेत. अशाच एका प्रमोशन इव्हेंट दरम्यान अजय आणि तब्बू एकत्र दिसले.

हा इव्हेंट होता’ भोला’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा आणि यावेळी तब्बूने आपल्या जबरदस्त लुकने सगळी लाईमलाईट हिरावून घेतली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वयाच्या 52 व्या वर्षी ज्या पद्धतीने तब्बूने स्वत:ला मेंटेन ठेवत आपली ब्युटी आणि फॅशन राखली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. या इव्हेंटसाठी तब्बूने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती आणि त्यात ती खूपच गोड व आकर्षक दिसत होती. याआधी अजय देवगणच्या गालावर कीस करत तिने चाहत्यांचे लक्ष वेधले होते तर आता त्याच्या कंबरेवर हात ठेवून कातील पोझ दित चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. (फोटो सौजन्य :- योगेन शाह, Instagram – tabutiful)

हेही वाचा :  "नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!

स्टायलिश लुक

स्टायलिश लुक

अजय देवगण आणि तब्बु त्यांच्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी एकत्र आलेले दिसले. यावेळी नेहमीप्रमाणे दोघे अगदी स्टायलिश दिसत होते. पण सर्वाधिक भाव खाल्ला तो अभिनेत्री तब्बूनेच! तब्बूने या आधी एक सौंदर्यवती म्हणून मोठा काळ गाजवला आहे. आज भले तिचे वय 52 असेल पण तरी तिने तिच्या सौंदर्याची जादू अजिबात कमी झालेली नाही. हे पुन्हा एकदा तिच्या या लुक मधून दिसून आले.

(वाचा :- International Women’s Day छोट्या शहरातील महिला करोडोंची मालकीण, प्रवास ऐकून भारतातील मोठमोठे बिझनेसमॅनही अवाक्)​

सिल्क साडीची हवा

सिल्क साडीची हवा

तब्बूने या खास इव्हेंटसाठी निळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती, ज्यावर टाय-डाय प्रिंट दिसत होती. गडद आणि हलक्या निळ्या रंगाच्या सुंदर प्रिंटमुळे तिच्या साडीचा आकर्षकपणा अधिक वाढला होता. तिच्या या साडीमध्ये बॉर्डरवर ग्रीन कलरची पायपिंग करण्यात आली होती, जी खूपच अनोखी दिसत होती. तुम्हालाही कदाचित माहितच असेल की आजकाल अशा प्रकारच्या साड्यांचा ट्रेंड खूप चालला आहे. तिच साधी सिंपल पण ट्रेंडिंग स्टाईल तब्बूने कॅरी केली होती.

हेही वाचा :  मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?

(वाचा :- ऋतिक रोशनच्या बायकोची मिनी ड्रेसमध्ये एंट्री, फुलाफुलांचा डीपनेक फ्रॉक अन् हाय हिल्सने वाढवलं इंटरनेटचं तापमान)​

स्लिव्हलेस ब्लाउजचा जलवा

स्लिव्हलेस ब्लाउजचा जलवा

तब्बूने साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये ऊम्फ फॅक्टर वाढला होता. पोनीटेलमध्ये तिने आपले केस स्टाईल करून सोबत मिनिमल मेकअप केला होता आणि आपला लुक कम्प्लिट केला होता. तब्बूला स्वत:ला फॅशन आणि स्टाईलची जाण असल्याने आपल्यावर नक्की काय सूट होते हे तिला बरोबर माहित आहे. म्हणूनच तिने या अशा साडीसोबत स्लीवलेस ब्लाउज निवडून लुक परफेक्ट बनवला.
(वाचा :- मिथुन चक्रवर्तीची सूनबाई जणू फॉरेनची पाटलीनबाईच, यलो डीपनेक व स्लिट कटमधील कातील अदा बघून थांबतील काळजाचे ठोके)​

अजयचा हँडसम लुक

अजयचा हँडसम लुक

तब्बूने इव्हेंटची लाईमलाईट हिरावून घेतली हे जरी खरे असले तरी अजय सुद्धा नेहमीप्रमाणेच हँडसम दिसला. अजय देवगणने आपल्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या खास इव्हेंटसाठी लाइट स्काय ब्लू कलरचा शर्ट, डेनिम जीन्स, ब्लॅक जॅकेट आणि मफलर घातला होता, ज्यामध्ये तो अगदी किलर दिसत होता.

(वाचा :- नव-याच्या भेटीसाठी मिनी फ्रॉकमध्ये सजली चारू असोपा, डिवोर्सच्या बातम्यांवर टिच्चून रोमॅंटिक फोटो तुफान व्हायरल)​

हेही वाचा :  अजबच! घरात सापडली 200 वर्षे जुनी प्राचीन गुहा, तरुणी धाडस करत आत गेली; पण...

तब्बूचा सर्व तरुणींना संदेश

तब्बूचा सर्व तरुणींना संदेश

तब्बूला स्वत:ला फॅशन आणि स्टाईलचा जबरदस्त सेन्स आहे. पण तरी ती इतरांना एक खास ब्युटी मेसेज देताना म्हणते की, बाहेरून सुंदर दिसण्यासाठी खूप काही करता येऊ शकतं, पण जर तुम्हाला चिरतरुण सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आतील सौंदर्यावर काम करावं लागेल. जेव्हा तुम्ही मनापासून आतून खुश राहाल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही बाहेरून सुद्धा सुंदर दिसाल. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरजच नाही. तब्बू आपल्या कामावर खूप प्रेम करते. काम केल्यावर तिला आतून समाधान मिळते आणि ती अधिक आनंदी राहते.

(वाचा :- किलर शॉर्ट वनपीसमध्ये फिगर फ्लॉंट करत करीनाने ऐन उन्हाळ्यात लावली इंटरनेटवर आग,करिश्माचा लुक बघून श्वासच) रोखाल​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …