Influenza Threat : वातावरणातील बदलाने H3N2 विषाणूचा फैलाव, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना

Influenza H3N2 virus : होळीपूर्वी देशात इन्फ्लूएंझा (H3N2 ) विषाणूचा कहर वाढत आहे. उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांमध्ये नव्या विषाणूची रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाप्रमाणे त्याची अनेक लक्षणे दिसून येत आहे. वातावरणात सतत होणारा बदल, रात्रीची थंडी, दिवसा उकाडा, मध्येच येणारा पाऊस, ढगाळ हवा यामुळे विचित्र आजार वाढत आहेत. सर्दी, खोकला, तापाची साथ पसरली आहे. (H3N2 virus hits India) दोन दिवसांपूर्वी आयसीएमआरने ‘एन्फ्लूएंझा ए’ चा उपप्रकार H3N2 हा विषाणू सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचा इशारा दिला होता. वातावरणातलं वाढलेलं प्रदूषणही व्हायरल साथींच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा अशी सूचना करण्यात आली आहे. (H3N2 Virus Outbreak In India)

कोरोना सदृश इन्फ्लूएंझा (H3N2 व्हायरस) देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून विविध प्रकारची लक्षणे दिसू लागली आहेत. किंवा इन्फ्लूएंझामध्ये, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. दोन्ही राज्यात सरकारकडून दक्षता येते आहे. त्याचवेळी महाराष्ट्रालाही दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेजारी राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आता महाराष्ट्रात पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या विषाणूचा धोका वाढू शकतो, असे म्हटले आहे.

हेही वाचा :  मुंबईत राहतो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; 7.5 कोटींची संपत्ती, उच्चभ्रू भागात आहे आलिशान घर

ही आहेत प्रमुख लक्षणे

कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोकं वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत असून विविध प्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला असून रुग्णांची व्यवस्था रुग्णालयांमध्येही करण्यात येत आहे. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. याचा त्रास गर्भवती महिलांनाही होत असून स्वच्छता राखणे, गर्दी टाळली गेली तर यापासून धोका टाळता येणार आहे. 

कर्नाटकात सरकारने घेतला आढावा

कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी मंगळवारी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा झाली आणि पुढील कृती आराखडा नियोजनावर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येईल. रुग्णालयांमध्येही मास्क घालण्याबाबत आदेश जारी केला आहे. 15 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील वृद्ध लोकांमध्ये इन्फ्लूएंझाची अधिक प्रकरणे दिसून येत असल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. याचा त्रास गर्भवती महिलांनाही होत आहे. स्वच्छता राखली, मोठी गर्दी नसेल तर हा विषाणू टाळता येईल, यावर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा :  Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्...

उत्तर प्रदेशात काय आहे परिस्थिती ?

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये H3N2 विषाणूचे रुग्ण सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड बनवत आहेत. यासोबतच कोरोना काळात जसा मास्क वापर करण्यात येत होता. त्याप्रमाणे मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कानपूरमध्येही इन्फ्लूएंझाचा कहर सुरुच आहे. तेथील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत, चाचणीत सर्व रुग्णांमध्ये या विषाणूची पुष्टी झालेली नाही, परंतु लक्षणे सारखीच दिसत आहेत. सध्या रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्ड पूर्णत: भरला आहे, अशा स्थितीत रुग्णांना इतर वॉर्डात हलवले जात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …