Drishyam 2 : पुन्हा एकदा दिसणार तब्बूची दहशत, अजय देवगण-श्रिया सरनच्या ‘दृश्यम 2’च्या शूटला सुर

Drishyam 2 Shooting : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) त्याचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ चा सिक्वेल अर्थात ‘दृश्यम 2’च्या (Drishyam 2) शूटिंगला सुरुवात केली आहे. मुंबईत सुरू झालेल्या या शूटिंगचा फोटो शेअर करत अजय देवगणने लोकांना प्रश्न विचारला आहे की, ‘विजय पुन्हा आपल्या कुटुंबाला वाचवू शकेल का?’ या चित्रपटात अजय पुन्हा एकदा श्रिया सरन (Shriya Saran), तब्बू (Tabbu) आणि इशिता दत्तासोबत (Ishita Dutta) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 वर्ष झाली आहेत. तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

‘दृश्यम 2’चे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच मुंबईत सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत गोव्यात शूटिंग होणार आहे. ‘दृश्यम’ ही विजय नावाच्या माणसाची कथा आहे, जो चौथीत नापास झाला आहे. पण, त्याच्या कुटुंबाच्या हातून झालेल्या हत्येमुळे त्याला संपूर्ण कुटुंबाला पोलिसांपासून वाचवावे लागते. या चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या 7 वर्षानंतर आता त्याच्या सिक्वलचे शूटिंग सुरू झाले आहे.

पाहा पोस्ट :

‘दृश्यम 2’ च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजय देवगणने लिहिले की, ‘विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का? ‘दृश्यम 2’चे शूटिंग सुरू झाले. या फोटोत अजय देवगणसोबत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रिया सरनही दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने बॉलिवूड अभिनेत्री तब्बूलाही टॅग केले आहे. म्हणजेच तब्बू पुन्हा एकदा ‘दृश्यम’चा भाग बनणार आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करताना अजय देवगण म्हणाला, ‘विजय हे एक असे पात्र आहे ज्याला अनेक आयाम आहेत आणि तो पडद्यावर एक अप्रतिम कथा तयार करतो. या चित्रपटाबद्दल अभिषेक पाठक (दिग्दर्शक) यांचा नवा दृष्टिकोन आहे. या सिक्वेलबद्दल मी खूप उत्सुक आहे.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Aishwarya Rai Bachchan : अशी निरागस होती ऐश्वर्या; पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल

Aishwarya Rai Bachchan Photo On Passport : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) …

Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा ‘लडकी : ड्रॅगन गर्ल’ चीनमध्ये होणार प्रदर्शित

Ladki The Dragon Girl : सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर …