तब्बल 21 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटनची मोठी स्पर्धा जिंकण्याची संधी

All England Open 2022 Finals: ऑल इंग्लंड ओपन 2022 स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवलीय. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्यान मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. भारतानं 21 वर्षापूर्वी इंग्लंड ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ही स्पर्धा जिंकता आली नाही. दरम्यान, लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर  ऍक्सेलसेनशी (Viktor Axelsen) भिडणार आहे. लक्ष्य सेन याच्याकडं 21 वर्षाचा दुष्काळ संपवण्याची संधी उपलब्ध झालीय. यामुळं यंदाच्या इंग्लंड ओपन स्पर्धेत लक्ष्य सेन कशी कामगिरी बजावतोय? याकडं सर्वांचं लक्ष्य लागलंय. 

1947 मध्ये प्रकाश नाथ, 1980 आणि 1981 मध्ये प्रकाश पदुकोण आणि 2001 मध्ये पुलेला गोपीचंद आणि 2015 मध्ये सायना नेहवाल यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये तर, पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये इंग्लंड ओपन स्पर्धेचा खिताब जिंकला होता. लक्ष्यनं अंतिम सामना जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल.

हेही वाचा :  पावसाचा व्यत्यय, डीएलएस मेथडनुसार सामना अनिर्णीत, मालिका भारतानं 1-0 नं जिंकली

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना आज (20 मार्च) भारतीय वेळेनुसार 07.30 वाजता खेळवला जाईल. लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यातील हा मोठा सामना बर्मिंघम, यूके येथील युटिलिटी एरिना येथे खेळवला जाईल. हा सामना VH1, MTV आणि History TV18 चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट सिलेक्ट अॅपवर पाहता येईल.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …