अर्जुन पुरस्कार विजेता बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन a भारतावादाच्या भोवऱ्यात, वय लपवल्याचा आरोप

Lakshya Sen News : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने आपल्या वयाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली असून शहरात बॅडमिंटन अकादमी चालवणारे नागराज एम.जी. यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘लक्ष्य सेन याचा जन्म 1998 मध्ये झाला होता, मात्र त्याने चुकीच्या पद्धतीने 2001 ही जन्मतारीख नमूद केली होती. खोटी कागदपत्रे तयार करून आरोपीने इतर खेळाडूंची फसवणूक करून शासनाकडून चुकीच्या पद्धतीने फायदा मिळविल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.’

बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन, त्याची आई निर्मला सेन, भाऊ चिराग सेन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. धीरेंद्र कुमार सेन हे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत, तर लक्ष्यचा भाऊ चिराग सेन हा देखील बॅडमिंटनपटू आहे. यंदा झालेल्या बर्मिंगहम येथील कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Gams 2022) स्पर्धेत लक्ष्य सेन याने कमाल कामगिरी करत भारताची पदक संख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी पार पाडली होती.

हेही वाचा :  बीसीसीआयकडून अध्यक्षांसह संपूर्ण निवड समितीच बरखास्त; 5 मोठे कारण समोर

लक्ष्यच्या भावावरही आरोप

लक्ष्य आणि त्याचा भाऊ चिराग या दोघांच्या जन्माच्या दाखल्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशन विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीच्या प्रशिक्षकांच्या संगनमताने दोघेही कमी वयोगटातील प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2010 पासून हे सर्व होत असल्याचंही तक्रारीत नमूद आहे. तक्रारदार नागराजू यांनी ही तक्रार दाखल केली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्य सेन याला नुकतंच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

News Reels

हे देखील वाचा-

Arjuna Award 2022 : लक्ष्य सेनसह कॉमनवेल्थ गाजवणारे खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा सविस्तर यादी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …