लक्ष्य सेन आणि व्हिक्टर ऍक्सेलसन यांच्यात आज महामुकाबला; कधी, कुठे, कसा पाहता येणार सामना?

Lakshya Sen vs Viktor Axelsen: भारताच्या लक्ष्य सेननं चुरशीच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जिआवर 21-13, 12-21, 21-19 असा विजय मिळवत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी (All England Open 2022) भिडणार आहे. या सामन्यात लक्ष्य सेनकडं इतिहास रचण्याची संधी आहे. हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? यावर एक नजर टाकुयात.

इंग्लंड ओपन स्पर्धेत भारताची कामगिरी
1947 मध्ये प्रकाश नाथ, 1980 आणि 1981 मध्ये प्रकाश पदुकोण आणि 2001 मध्ये पुलेला गोपीचंद आणि 2015 मध्ये सायना नेहवाल यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये तर, पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये इंग्लंड ओपन स्पर्धेचा खिताब जिंकला होता. लक्ष्यनं अंतिम सामना जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल.

कुधी, कुठे पाहणार सामना?
ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना आज (20 मार्च) भारतीय वेळेनुसार 07.30 वाजता खेळवला जाईल. लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यातील हा मोठा सामना बर्मिंघम, यूके येथील युटिलिटी एरिना येथे खेळवला जाईल. हा सामना VH1, MTV आणि History TV18 चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट सिलेक्ट अॅपवर पाहता येईल.

हेही वाचा :  Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …