सूर्योदय योजना… राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर PM मोदींकडून देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा

Pradhanmantri Suryodaya Yojana: ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.   राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.  सूर्योदय योजना असे या सोजनेचे नाव आहे.

सरकार ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर केले. सरकारची ही अत्यतं महत्वकांक्षी योजना आहे. याचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकार   ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे.

सूर्योदय योजना नेमकी आहे तरी काय?

हेही वाचा :  धावत्या रेल्वेतून आरोपीचे पलायन; पुणे पोलिसांची मात्र 'त्या' अधिकाऱ्यांवर मेहेरबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत या योजनेची माहिती देशवासियांना दिली आहे. अयोध्येतून परतल्यानंतर मी माझा पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार एक कोटी घरांवर छतावर सौर पॅनल बसवणार आहे. हेच लक्ष्य घेऊन सरकरा ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होईलच. याशिवाय पण ऊर्जा क्षेत्रात देश स्वावलंबी बनेल असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हंटले आहे. तसेच हे सोलर पॅनेल कसे असतील याचे फोटो देखील पंतप्रधान मोदी यांनी शेअर केले आहेत. 

 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पदडा हटवण्यात आला आणि रामलल्लाचं सुंदर दर्शन जगाला झालं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली… विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं. 

हेही वाचा :  Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …