Success Story: गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात दिली UPSC परीक्षा, IPS पूनम यांची कहाणी लाखो तरुणांना देईल प्रेरणा

Success Story: प्रत्येक यशाची कहाणी ही कठोर संघर्षातून पुढे गेलेली असते. आयपीएस अधिकारी पूनम दलाल दहिया यांची कहाणी देखील लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथील आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी त्यांचे शिक्षणही तेथूनच झाले. २०२२ मध्ये बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी २ वर्षांचा जेबीटी कोर्स (ज्युनियर बेसिक ट्रेनिंग) केला. त्यानंतर तिने रोहिणीच्या एमसीडी शाळेत २ वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. नोकरीसोबतच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशनही केले.

२००७ मध्ये पूनम दलाल दहिया यांचे लग्न नवी दिल्लीच्या कस्टम एक्साइज विभागात काम करणाऱ्या असीम दहियांशी झाले. त्यांच्या पतीने पूनम यांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप साथ दिली. २००९ मध्ये यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवल्यानंतर त्यांना रेल्वे विभाग (RPF) मिळाला. मात्र त्यांनी सहभागी न होता पुढच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली. २०१० साली त्यांना पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात रेल्वे खाते मिळाले. यावेळी आयआरपीएस रँक मिळाला.

दरम्यान २०११ मध्ये पूनम दलाल दहिया यांनी हरियाणा पीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि हरियाणा पोलिसात उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या. यासोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली. २०११ च्या प्रयत्नात त्या यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. तोपर्यंत त्या वर्षांच्या होत्या. त्यामुळे हा त्यांच्यासाठी शेवटचा प्रयत्न होता.

हेही वाचा :  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Success Story: शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना, कोणतेही कोचिंग न लावता लेक झाली कलेक्टर

केंद्र सरकारने २०११ च्या यूपीएससी परीक्षेच्या प्रयत्नात बसलेल्या सर्व उमेदवारांना आणखी एक संधी दिली होती. वास्तविक २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेचा पॅटर्न बदलल्यामुळे उमेदवारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. यानंतर अनेक उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. पूनम यांनी या संधीचा फायदा करुन घेतला.

२०१५ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी पूनम दलाल दहिया यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये त्यांना प्रिलिम्स परीक्षेत २७५ गुण मिळाले. तेव्हा त्या ९ महिन्यांच्या गरोदर होत्या. यूपीएससी मुख्य परीक्षेच्या वेळी त्यांचे मूल अडीच ते तीन महिन्यांचे होते. यामध्ये त्याने ८९७ गुणांसह ३०८ वा क्रमांक मिळवला. सध्या त्या हरियाणा पोलिसात एएसपी म्हणून कार्यरत आहेत.

पूनम दलाल दहिया यांनी २ पुस्तके लिहिली आहेत. पहिल्याचे शीर्षक ‘प्राचीन आणि मध्ययुगीन भारत’ आणि दुसरे ‘आधुनिक भारत’ अशी या पुस्तकांची नावे आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते मॉडर्न इंडिया पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.

Success Story: इंजिनीअरिंग करणारी सृष्टी देशमुख पहिल्याच प्रयत्नात बनली आयएएस अधिकारी
Success Story: कोणी रस्त्यावर अंडी विकली तर कोणी सायकलचे पंक्चर काढले,परिस्थितीवर मात करुन बनले सरकारी अधिकारी

हेही वाचा :  Police Recruitment: पोलीस भरतीचे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …