जिम, डाएट सोडा आणि फक्त Tapeworm Diet फॉलो करा, अक्षरशः चरबी वितळवेल ही गोळी

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे फंडे वापरतात. जिममध्ये जाण्यापासून ते डायटिंगपर्यंत वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाला जिममध्ये जाताच येतं असं नाही त्यामुळे कुणी शाकाहारी आहार, केटो आहार, लो-कार्ब आहार आणि झोन आहार यासारख्या विविध आहार योजनांचे अनुसरण करणे.

MDPI जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार वजन कमी करण्याच्या पद्धती आजच्या नसून प्राचीन काळापासूनच्या आहेत. वजन कमी करण्याच्या आहारात ‘टॅपवर्म डाएट’ हे नावही आहे. या डाएट प्लॅनचे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकले असेल पण ते व्हिक्टोरियन काळातील आहे आणि त्या काळात राण्यांनी स्लिम राहण्यासाठी याचा वापर केला होता.

हा आहार आजही काही लोक वापरत आहेत. कारण त्यांना वाटते की आहार किंवा व्यायाम न करता वजन कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. टेपवर्म आहार म्हणजे काय? ते वजन कसे कमी करते आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

हेही वाचा :  हे 8 पदार्थ मनसोक्त खाल्ले तरी वाढणार नाही टिचभरही वजन, 40 पेक्षाही कमी कॅलरीने भरलेत ठासून

Tapeworm Diet म्हणजे काय?

tapeworm-diet-

टेपवर्म डाएटमध्ये एक अशी गोळी वापरली जाते ज्यामध्ये टेपवर्मची अंडी असतात. ही गोळी खाण्यामागचे कारण असे की, जेव्हा हा जंत आतड्यात जातो तेव्हा तिथे अंडी उबतात म्हणजेच त्यांची संख्या वाढते. असे मानले जाते की, हे जंत तुम्ही खात असलेल्या अन्नावर जगतात, त्यामुळे तुमच्या शरीरात चरबी जमा होत नाही आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.

(वाचा – पायांना घाणेरडा वास येतोय? याचे कारण फक्त शूज नाही, तर किडनी – रक्ताच्या सडण्यासारख्या ६ आजारांचे आहेत संकेत)

Tapeworm Diet कशी सुरूवात झाली?

tapeworm-diet-

हेल्थलाइन या प्रसिद्ध आरोग्य वेबसाइटच्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, टेपवर्म आहाराची सुरुवात व्हिक्टोरियन काळात झाली. असे मानले जाते की, राणी आणि इतर स्त्रिया सुंदर आणि सडपातळ दिसण्यासाठी याचा वापर करतात. त्या काळातील सौंदर्याची व्याख्या अशी होती की, स्त्रियांना टीबीचा आजार व्हावा अशी इच्छा असायची. कारण यामुळे त्यांची त्वचा फिकट दिसायची, डोळे पसरलेले दिसायचे, गाल आणि ओठ लाल दिसायचे आणि कंबर नेहमीच पातळ दिसायची.

(वाचा – Anant Ambani च्या पुन्हा वजन वाढण्यामागचं कारण काय, कोणत्या चुका ठरतात कारणीभूत?)

हेही वाचा :  शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा

कंबर एकदम पातळ करतात हे डाएट?

कंबर एकदम पातळ करतात हे डाएट?

त्या काळात सौंदर्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी महिलांनी सर्व उपाय केले. टेपवर्म आहार हा त्या धोकादायक उपायांपैकी एक होता. वजन कमी करून पातळ कंबर बनवण्याच्या इच्छेने महिलांनी या जंताच्या गोळ्यांचे भरपूर सेवन केले. हा डाएट आजही अनेक लोक फॉलो करतात.

(वाचा – Ayurvedic Medicine for Thyroid : थायरॉइड रूग्णांकरता टॉनिकसारखं काम करतो या पानांचा चहा, आता औषधं घेण्याची गरज नाही)

Tapeworm Diet चे नुकसान

tapeworm-diet-

अर्थात यामुळे तुमचे वजन कमी होते, पण आतड्यांमध्ये जन्माला येणारे जंत तुमच्या शरीरातील पोषक तत्वे खाऊ लागतात. आतड्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही भागात जंत पोहोचले तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशा स्थितीत तुम्हाला जुलाब, पोटदुखी, मळमळ, अशक्तपणा, ताप, संसर्ग आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

कुठे मिळतात Tapeworm च्या गोळ्या?

-tapeworm-

या डाएट प्लॅनवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. बरेच लोक याला वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग मानतात, तर अनेक तज्ञ याला आरोग्यासाठी हानिकारक म्हणतात. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या गोळ्यांवर बंदी घातली आहे. या गोळ्या अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने विकल्या जात असल्या तरी गोळीच्या आत काय आहे हे सांगणे कठीण आहे त्यामुळे काळजी घ्या.

हेही वाचा :  निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष

वजन कमी करण्यासाठी काय कराल?

वजन कमी करण्यासाठी काय कराल?

वजन कमी करण्यासाठी कोणतीही जादूची गोळी नाही, जरी ती टेपवर्मच्या स्वरूपात आली तरीही. यामुळे अनेक धोकादायक गुंतागुंत निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी, आपल्याला निरोगी जीवनशैली आणि आहाराची आवश्यकता आहे. तुमच्या अन्नामध्ये जीवनसत्त्वांची कमतरता पडू देऊ नका, भरपूर पाणी प्या, दररोज व्यायाम करा आणि भरपूर भाज्या आणि फळे खा.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …