उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाचे स्वतंत्र दसरा मेळावे बुधवारी एकाच दिवशी व एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड गर्दीत व जल्लोषात साजरे झाले. या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना प्रचंड टोले लगावले. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा पुन्हा ‘गद्दार’ असाच उल्लेख केला. तर ‘शिवसेनाप्रमुखांचे विचार विकणारे’ अशी तिखट टीका शिंदे यांनी केली. त्यामुळं दोघांच्या भाषणाची प्रचंड चर्चा झाली.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही भाषणाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कोणाचं भाषण हिट ठरलं, काणाच्या सभेला जास्त गर्दी जमली, अशा कमेंट्स दोन्ही गटाचे कार्यकर्ते चढाओठीनं करत आहेत. अनेकांनी जाहिरपणे कोणाच्या भाषणाचा जास्त प्रभाव जाणवला, आवडलं याची स्पष्ट उत्तरंही दिली आहे. परंतु काहींनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक विजू माने यांनी दसरा मेळावा, आणि भाषणासंदर्भात शेअर केलेली पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
काय आहे विजू मानेंची पोस्ट?
‘स्वतः उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कस झालं हे सांगण्यापेक्षा… मला झेपेल ते मी करतो…. असं त्यांनी लिहलं आहे. या फोटोत एक झोपलेला व्यक्तीही दिसतोय. विजू माने यांनी सोशल मीडियावर सुरू असेलल्या चर्चेवर भाष्य केलंय. तसंच राजकीय तज्ञ असल्यासारखं वागणं बंद करा. काही गोष्टी इतक्या गंभीर असतात…त्या राजकारण्यांवर सोडून दिलेल्या बऱ्या, असंही विजू माने यांनी लिहिलं आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या