SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबाद- पंजाब यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

SRH vs PBKS, IPL 2022: आज आयपीएलच्या (IPL 2022) अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आलेय. अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील एकूण सामन्याची आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 19 सामने झाले आहेत. यामध्ये 13 सामन्यात हैदराबादने तर सहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना फक्त औपचारिक आहे. पण या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न पंजाब आणि हैदराबाद करतील, यात शंका नाही. 

कसा आहे पिच रिपोर्ट?
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी येथे जास्त आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. खेळपट्टी गोलंदाजाला मदत करेल असा अंदाज आहे. पण दुसऱ्या डावात फलंदजीसाठी पोषक असेल. 

कधी, कुठे रंगणार सामना?
आज 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.

हे देखील वाचा- 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous तो परत आलाय! हार्दिक पांड्याचं भारतीय संघात पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदान गाजवायला सज्ज
Next हैदराबादने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, दोन्ही संघात बदल, पाहा आजची अंतिम 11

Check Also

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमी संघाबाहेर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या …

ठरलं… टीम इंडियासोबत वर्ल्ड कपसाठी ‘हे’ खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार!

मुंबई, 17 सप्टेंबर: 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी जवळपास …