सोनम आणि आनंद यांनी लेकाचं नाव ठेवलं खास, हनुमान आणि भीम यांच्या…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असल्यापासूनच चर्चेत आहे. २० ऑगस्टला तिनं मुलाला जन्म दिला. तमाम बॉलिवूडकरांनी सोनम-आनंदचं अभिनंदन केलं. अनिल कपूरही आजोबा झाला, म्हणून खूश आहे. सध्या सोनम आणि आनंद आपली नवी भूमिका एंजॉय करत आहेत. पहिल्यांदाच आई बाबा झाल्यानं ते आनंदात आहेत.

सोनम आणि आनंद यांच्या लेकाचं नुकतंच बारसंही झालं. सोनमनं एक खास पोस्ट शेअर करत तिच्या लेकाचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या लेकाचं नाव वायू कपूर अहुजा असं ठेवलंय.

चाहत्यांना आवडलं नाव
सोनमनं हिंदू धर्मात वायू शब्दाला असलेलं महत्त्व सांगत, या नावाचा अर्थही चाहत्यांसोबत शेअर केलाय. इतर सेलिब्रिटी तसंच चाहत्यांनी खूप छान नाव आहे, असं म्हणत सोनमच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, सोनमच्या लेकाचे काही फोटो याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनमची डिलिव्हरी झाल्यानंतर तिला आणि बाळाला बघायला आजी सुनिता आणि मावशी रिया कपूर गेल्या होत्या. त्यावेळी ट्रॉलीमध्ये दुपट्यात गुंडाळून ठेवलेल्या आपल्या भाच्याला पाहून रियाला अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भेटीचे फोटो ही सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.

दरम्यान, सोनम कपूरनं ती आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर मार्चमध्ये दिली होती. ही बातमी देताना तिनं बेबी बम्प दाखवणारे फोटो शेअर केले होते.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

केसात गजरा आणि नेसलेली लुंगी; पाठकबाईंची खास साऊथ इंडियन स्टाईल बॅचलर पार्टी

मुंबई, 21  सप्टेंबर : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत  राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रिन …

‘अगंबाई अरेच्चा’तील ती चिमुकली; ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई, 21 सप्टेंबर : दिग्दर्शक केदार शिंदे यांची मराठी नाटकं असो किंवा सिनेमा.  त्यांचा प्रत्येक …