सिद्धार्थ -कियारा अडकणार विवाहबंधनात, बालमैत्रिण ईशा आंबानी पतीसह पोहोचली लगीनघरी 

kiara advani sidharth malhotra wedding   : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी  (Kiara Advani) यांच्या लग्नाच्या विधी जैसलमेरमधील सुर्यगढ या हॉटेलमध्ये सुरू झाल्या आहेत. आज कियारा आणि सिद्धार्थच्या हातावर मेहेंदी लावण्यात आली. रॉयल वेडिंगला हजेरी लावण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यही वेडिंग डेस्टिनेशनवर पोहोचले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी पती आनंद पिरामलसोबत रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता जैसलमेरला पोहोचली आहे.

इशा आंबानी आणि कियारा यांची बालपणीची मैत्री आहे. बालमैत्रीणीचं लग्न आहे म्हटल्यावर ईशा आपल्या कुटुंबासह हजेरी लावणार. त्यामुळे ईशा अंबानी पती आनंद पिरामल यांच्यासह मुंबईहून चार्टर्ड फ्लाइटने जैसलमेर विमानतळावर पोहोचले आणि तेथून सूर्यगढ पॅलेस गॉनला रवाना झाले. ईशा आणि आनंद विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच अंबानींची खासगी सुरक्षा, रिलायन्सचे स्थानिक अधिकारी, स्थानिक पोलिसांच्या दोन जीप आणि 15-20 वाहनांचा ताफा जैसलमेर विमानतळावर दोघांना पिकअप करण्यासाठी सुमारे 2 तास थांबले होते. ईशा आणि आनंद विमानतळाबाहेर येताच वाहनांचा ताफा सूर्यगड पॅलेसकडे रवाना झाला.

बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा  आणि कियारा आडवाणीची गणना होते. सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून त्यांच्या लग्नसोहळ्याला शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावणार आहेत.  
 
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळा कुटुंबीय आणि मोजक्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच, मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. राम चरण, कबीर सिंह, शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत, अभिषेक बच्चन, करण जौहर, अश्विनी यार्डी, वरुण धवन, विकी कौशल, कतरिना कैफ, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

हेही वाचा :  रिलीजआधीच शाहरुखच्या 'पठाण'ची बॉक्स ऑफिसवर हवा

kiara advani sidharth malhotra wedding :  अनेक वर्षांच्या डेटींगनंतर होणार विवाहबद्ध 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण आता अखेर ते लग्नबंधनात अडकणार आहेत. संगीत, मेहंदी आणि हळदी समारंभाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या एका महालात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 

महत्वाच्या बातम्या 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Digambar Naik : दिगंबर नाईकचं ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर

Digambar Naik : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) …

‘या’ आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?

Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक …