Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

छगन भुजबळ हे काल येवल्याहून नाशिक जात होते. यावेळी त्यांना बरे वाटत नव्हते. अचानक त्यांची प्रकृती बिघडली.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते नाशिक येथील घरी विश्रांती घेत आहेत.

आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती त्यांनी समाजमाध्यमातून दिली. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा :  एका कमेंटवरून सुरू झाली राहुल वैद्य आणि दिशा परमारची Love Story, नॅशनल टीव्हीवर प्रपोज करून जिंकले मन

भारतात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता

राज्यात आणि देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहेत. गेल्या 24 तासात देशात 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन रुग्ण उत्तर भारतातील आहेत. त्याचवेळी, या कालावधीत देशात 1805 नवीन रुग्ण आढळले. भारतीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 10 हजार 300 आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2471 केसेस केरळमधील आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 2117, गुजरातमध्ये 1697, कर्नाटकात 792, तामिळनाडूमध्ये 608, दिल्लीत 528 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत जिथून मृत्यूची नोंद झाली आहे. दक्षिण आणि मध्य भारतानंतर आता उत्तर भारतातही कोरोनाचे वर्चस्व आहे. उत्तर प्रदेस, चंदीगड, हिमाचल आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक मृत्यू नोंदवला गेला आहे.  



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार

Weather Update in India, Heavy Rainfall : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स हाती आली आहे. देशात उष्णतेच्या …

नव्या संसद भवनाचे आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन, 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन …