शाहरुखच्या ‘पठाण’नं आठव्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

Pathaan Box Office Collection Day 8:  गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात ‘पठाण’ (Pathaan) फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखनं पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत…

पठाणचं कलेक्शन 

सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी (1 फेब्रुवारी) 18 कोटींची कमाई केली आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. लवकरच हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. 

#Pathaan early estimates for All-India Nett for Day 8 is around ₹ 18 Crs..

— Ramesh Bala (@rameshlaus) February 2, 2023

रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी ‘पठाण’ चित्रपटानं 55 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.50 कोटी आणि पाचव्या दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. तसेच, सहाव्या दिवशी या चित्रपटानं  भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. मंगळवारी (31 जानेवारी) या चित्रपटानं 23 कोटींचे कलेक्शन केलं आहे.



Source link

हेही वाचा :  500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला पठाण

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …