रिचा चड्ढाच्या ट्वीटची चर्चा; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं ट्रोल

Richa Chadha: अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं केला आहे, असा आरोप काही नेटकरी तिच्यावर करत आहेत.  

काय आहे प्रकरण?

लेफ्टिनेंट लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या पीओके संदर्भात एक ट्वीट केलं.  भारतीय सैन्य ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार असल्याचे द्विवेदी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं. त्यांच्या या ट्वीटला  रिचाने ‘गलवानने HI म्हटलंय’ असा रिप्लाय दिला. रिचाने गलवानसंदर्भात अशा पद्धतीचं ट्वीट करून भारत आणि चीनदरम्यान 2020 मध्ये झालेल्या गलवान संघर्षात शहीद जवानांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. भारतीय लष्कराबद्दलचं हे अत्यंत अपमानकारक ट्वीट असल्याचं म्हणत अनेकांनी रिचावर राग व्यक्त केला आहे. 

रिचाच्या या ट्वीटनंतर आता सोशल मीडियावर अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. भाजप नेते  मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्वीट शेअर करुन रिचाच्या ट्वीटचा समाचार घेतला आहे. ‘निंदनीय ट्वीट. हे ट्वीट लवकरात लवकर मागे घेण्यात यावे. आपल्या सशस्त्र दलांचा अपमान करणाऱ्याचं समर्थ करु नये.’ असं ट्वीट  मनजिंदर सिंह सिरसा यांनी केलं आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर करुन रिचाच्या ट्वीटचा निषेध केला आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

हेही वाचा :  Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान!

Richa Chadha : ‘अब की बार प्यार ही प्यार..’, रस्त्यावर उभं राहून अभिनेत्री लोकांना देते ‘Free Hug’!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …