संशोधन आणि विकास आस्थापनेत भरती, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी

Research and Development Establishment Job: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे.

संशोधन आणि विकास आस्थापनेत ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर, मेकॅनिकल ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशनच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी उमेदवारांची ६ फेब्रुवारी रोजी मुलाखत होणार आहे.

कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअर/कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंगच्या एकूण २ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची ८ फेब्रुवारी रोजी मुलाखत होणार आहे.

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत मिळेल नोकरी; पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या

मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या एकूण १४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची १० फेब्रुवारी रोजी मुलाखत होणार आहे.

हेही वाचा :  Success Story: पाचवेळा अपयशी पण खचला नाही; सहाव्या प्रयत्नात IES क्रॅक करुन देशात ४४ वा, गौरवची कहाणी जाणून घ्या

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक + नेट / गेट किंवा एमई/ एमटेक/एमएसपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. संस्थेने दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

७,८ आणि १० फेब्रुवारी रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

MeitY Job: केंद्रीय मंत्रालयाअंतर्गत बंपर भरती, ३० हजारपर्यंत मिळेल पगार
Fire Brigade Job: बारावी उत्तीर्णांना अग्निशमन विभागात नोकरी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार

हेही वाचा :  २०२३ मध्ये ८ लाख ६० हजार तरुणांना मिळणार Digital Marketing क्षेत्रात नोकऱ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …