रामचरणने ऑस्करपेक्षा जास्त बायकोसोबत बेबीमून केलं एन्जॉय, का साजरा करतात Babymoon

ऑस्कर 2023 साठी यूएसला पोहोचलेला RRR चित्रपटाचा नायक रामचरण याने आपल्या पत्नीसोबत बेबीमून साजरा केला. दोघांनीही प्रवासादरम्यान भरपूर शॉपिंग केली, डॉल्फिन पाहण्यासोबतच खूप आनंद लुटला. ऑस्कर 2023 मधून वेळ काढून रामचरणने त्याची गर्भवती पत्नी उपासना हिला बेबीमूनसाठी नेले. उपासनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये दोघेही निसर्गासोबत, खरेदी करताना आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते. (फोटो सौजन्य – upasanakaminenikonidela इंस्टाग्राम)

रामचरणच्या पत्नीची पोस्ट

​पतीचे मानले आभार

​पतीचे मानले आभार

पत्नीला बेबीमूनला घेऊन जाण्यासाठी व्यस्त शेड्युलमधून वेळ काढल्याबद्दल उपासनाने तिच्या इंस्टाग्रामवर रामचरणचे आभारही मानले होते. तिच्या व्हिडिओवर उपासनाने ‘खूप व्यस्त असतानाही आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद’ असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही बेबीमूनला गेले आहेत. तुम्ही पण विचार करत असाल की, तुम्ही हनिमूनबद्दल ऐकले असेल, बेबीमून म्हणजे काय? चला तर मग आम्ही तुम्हाला बेबीमून म्हणजे काय ते सांगतो.

हेही वाचा :  राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

​(वाचा – मार्क झुकरबर्गला तिसऱ्यांदा कन्यारत्न, मुलीला दिलं इतकं गोंडस नाव, जाणून घ्या अर्थ )

​हनीमून सारखाच असतो बेबीमून

​हनीमून सारखाच असतो बेबीमून

हेल्थलाइनच्या मते, बेबीमून हा हनीमूनसारखाच असतो, जो एक सेलिब्रेट व्हेकेशन असतो, पण लग्नानंतर तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्याऐवजी तुम्ही बाळाच्या आगमनापूर्वी त्यांच्यासोबत काही खास क्षण घालवता. आजकाल हा ट्रेंड खूप वाढला आहे.

​(वाचा – या संतांच्या नावावरून मोहम्मद कैफने ठेवलंय मुलाचं नाव, भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल)

​का गरजेचा आहे बेबीमून​

​का गरजेचा आहे बेबीमून​

बाळाच्या आगमनानंतर, पती-पत्नीची भूमिका बदलते आणि ते पालक बनतात. बाळाला सांभाळणे या जबाबदाऱ्यांमध्ये दोघांनाही एकमेकांसाठी कमी वेळ मिळतो. निदान मूल एक वर्षाचे होईपर्यंत नवरा-बायकोला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बेबीमूनच्या मदतीने दोघेही बाळाच्या आगमनापूर्वी काही वेळ एकत्र घालवू शकतात.

​​(वाचा – EXCLUSIVE : शिव ठाकरेच्या नावाचं रहस्य उलगडलं, आई या नावाने मारते हाक)

बेबीमूनला कधी जायला हवं?

बेबीमूनला कधी जायला हवं?

बेबीमूनला कधी जायचे याचे कोणतेही निश्चित असे नियम किंवा वेळेची मर्यादा नाहीत. तुम्हाला हवे तेव्हा गरोदरपणात तुम्ही बेबीमूनला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत बेबीमूनलाही जाऊ शकता. जेव्हा तुम्हाला सर्वात सोयीस्कर वाटत असेल तेव्हा तुमच्या बेबीमूनचा प्लान करू शकता. महिलांना गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत बरे वाटते, त्यामुळे हा काळ बेबीमूनसाठी सर्वोत्तम असू शकतो.

हेही वाचा :  "त्याला मारु नका", आईला घाबरुन मुलगा खिडकीच्या कठड्यावर आला अन् नंतर पुढच्या क्षणी....; धक्कादायक VIDEO

​​(वाचा – भाग्यश्रीच्या सौंदर्याप्रमाणेच मुलांची नावे ही आकर्षक, ‘इ’ अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ)

​बेबीमून करता कुठे जाण्याचा विचार कराल?

​बेबीमून करता कुठे जाण्याचा विचार कराल?

यावेळी अनेक प्रकारचे समज-गैरसमज आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा बेबीमून डेस्टिनेशन थोडा विचार करूनच निवडावा. याशिवाय मलेरियाचा धोका असलेल्या ठिकाणी जाणेही टाळावे. गरोदरपणात मलेरियामुळे गर्भपात, अकाली प्रसूती आणि अगदी मृत जन्म होऊ शकतो. मलेरिया हा एक घातक रोग आहे जो संक्रमित डासांमुळे पसरतो. बेबीमूनसाठी कोरोनाबाधित ठिकाणे आणि देशांमध्ये प्रवास करणे टाळा, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सहलीवरच नाही तर तुमच्या गर्भधारणेवरही होऊ शकतो.

​​(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …