Emojis : शब्दांवाचून भावना सहजपणे व्यक्त करणाऱ्या इमोजींचा शोध लावला तरी कुणी?

Emoji : एखादी भावना व्यक्त करायची असेल तर आपण त्यासाठी किती शब्द वापरतो ना? म्हणजे समजा तुम्ही कोणावर प्रेम करता तर ते सांगण्यासाठी किती गप्पागोष्टी कराव्या लागतात ना? कारण, असं थेट कसं कुणाला मी तुझ्यावर प्रेम करतो / करते असं म्हणायचं? हाच प्रश्न आपल्या मनात पहिल्यांदा घर करतो. फक्त प्रेमच नव्हे, तर एखाद्याचा द्वेष करत असतानाही ते सांगण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. पण, काही इवल्याश्या दोस्तांनी हे कामही सोपं केलं आहे. ही दोस्त मंडळी म्हणजे इमोजी (who invented Emojies read interesting history). 

लहानशी पिवळी किंवा रंगीबेरंगी वर्तुळं आणि त्यामध्ये प्रत्येक हावभाव अचूकपणे टीपणारे हावभाव अशी अफलातून कलात्मकता साकारत इमोजी तयार झाले. अनेकांसाठी, त्यातही मितभाषी मंडळींसाठी इमोजी म्हणजे तारणहार. हे सर्व केव्हा, जेव्हा तुम्ही एखाद्याशी चॅटवर बोलताय…. 

मला राग आलाय, मी उदास आहे, जेवण व्यवस्थित नव्हतं अशा प्रत्येतक लांबलचक वाक्याला हा एक इमोजी बोलून व्यक्त करतो. म्हणजे एखाद्याकडे डोळे मोठे करून पाहणं इथपासून ते अगदी एखाद्याचा पाणउतारा करण्यापर्यंतची किमया ते करतात. तुम्हाला माहितीये का ही भन्नाट कल्पना सुचली तरी कुणाला? 

हेही वाचा :  घरातच रिपेयर करा एसी, खूपच सोपी आहे प्रोसेस, या ८ स्टेप्स फॉलो करा

कोणी लावला इमोजींचा शोध? (Interesting Story of emoji)

असं म्हणतात, की शिगेताका कुरिता यांनी इमोजींचा शोध लावला. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी इमोजीचा पहिलावहिला सेट तयार केला. एका टेलिकॉम कंपनीसाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. 1998 ते 1999 दरम्यान रंगीबेरंगी इमोजी वापरात आले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण 1999 मध्ये NTT DOCOMO या जपानी कंपनीनं मोबाईल आणि पेजरसाठी तब्बल 176 इमोजींचा सेट वापरात आणला होता. किमान शब्दांत कमाल गोष्टी व्यक्त करता यावी या हेतूनं इमोजी तयार करण्यात आले. 

काही वर्षांपूर्वी ईमेल लिहितानासुद्धा शब्दमर्यादा होती. त्यामुळं ही त्रुटी इमोजींमुळं दूर झाली. कुरिता यांनी इमोजी तयार करण्यासाठी कॉमिक्स, टिकलिंग बॉम्ब, हवामान आमि अशा अनेक कल्पनांच्या मदतीनं अनेक भाव दर्शवणारे इमोजी तयार केले. पुढे 2007 मध्या (iPhone) आयफोनमध्ये इमोजी किबोर्ड सुरु झाला. हा शब्द इतका लोकप्रिय झाला की 2013 मध्ये त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान मिळालं. आजही शिगेताका कुरिता यांनी तयार केलेला 176 इमोजींचा संच न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये संग्रही ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. कमाल आहे ना हे?  

हेही वाचा :  'विरोधक तुम्हाला दगड म्हणतात', प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे म्हणाले "हे सर्व छोटे, मोठे..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …