आजचं राशीभविष्य, बुधवार, २३ फेब्रुवारी २०२२


मेष:-

घरातील कुरबुरी समजून घ्या. जि‍भेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील. अतिविचार करू नये.

वृषभ:-

जोडीदाराचे विचार जाणून घ्याल. उघडपणे बोलणे टाळाल. कमिशन मधून लाभ मिळेल. अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील.

मिथुन:-

फसवणुकीपासून सावध राहा. जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे.  कामाचा आनंद मिळेल.

कर्क:-

मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल. पोटाची तक्रार जाणवू शकते.

सिंह:-

उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे मनापासून कराल. जोडीदाराशी विचारविनिमय कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

कन्या:-

जोडीदाराची प्राप्ती वाढेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब  मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल. जवळचा प्रवास घडेल.

तूळ:-

कौटुंबिक शांतता जपावी. आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळवाल.

वृश्चिक:-

तुमची उत्तम छाप पडेल. गप्पा गोष्टींची मैफल जमवाल. मित्रा मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे.

हेही वाचा :  Astrology: कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपाय जाणून घ्या

धनू:-

आततायीपणा करू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.

मकर:-

आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे. धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. अपवादाकडे दुर्लक्ष करा.

कुंभ:-

चौकसपणे विचार कराल. मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.

मीन:-

कामाचा व्याप लक्षात घ्यावा. गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

The post आजचं राशीभविष्य, बुधवार, २३ फेब्रुवारी २०२२ appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …