रणबीर कपूरचा हटके अंदाज; ‘शमशेरा’ मधील ‘जी हुजूर’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Shamshera Song Ji Huzoor Released : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि  संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटामधील  ‘जी हुजूर’ हे गाणं रिलीज झालं आहे. गाण्यामधील रणबीरच्या डान्सनं आणि हटके स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रिलीज झाल्यानंतर काही वेळेतच या गाण्याला 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

‘शमशेरा’ चित्रपटामधील ‘जी हुजूर’ हे गाणं आदित्य नारायणनं गायलं आहे. गाण्यामध्ये काही चिमुकल्यांसोबत रणबीर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं पहिल्यानंतर आता अनेक प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. रणबीर कपूर, संजय दत्त, वाणी कपूर यांच्यासोबतच रॉनित रॉय, आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, आहाना कुमार आणि त्रिधा चौधरी यांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 

शमशेरा हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. ‘शमशेरा’ चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. 

पाहा गाणं:

 यशराज फिल्म्सच्या निर्मिती अंतर्गत निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 1800च्या उत्तरार्धावर आधारित आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

रणबीरचं मानधन

शमशेरा चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपट तो डबल रोज साकारणार आहे. रणबीरनं या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. शमशेरा चित्रपटासाठी रणबीरनं त्याच्या बॉडी आणि लूककडे विशेष लक्ष दिलं आहे. 

हेहा वाचा:

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous 85 हजाराचं फक्त पाकीट, 125 कोटींचं खाजगी विमान; विराट कोहलीचा नादच खुळा!
Next मुलांना ‘या’ ५ गोष्टी शिकवल्यामुळे ते कायमच राहतील अव्वल, सगळ्यांकडून होईल फक्त कौतुक

Check Also

हार्ट अटॅक, ब्रेन डेड आणि मृत्यू; असे होते Raju Srivastav यांचे शेवटचे काही दिवस

मुंबई, 21 सप्टेंबर : आज म्हणजे 21 सप्टेंबरला कॅमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी AIIMS रुग्णालयात …

इतके क्युट चाहते कधी पाहिलेत का? लतीला सेटवर मिळालं मोठं सरप्राईज

मुंबई, 21  सप्टेंबर-   मराठी मालिकांमध्ये सध्या नवनवीन रंजक विषय हाताळले जात आहेत. अशीच एक मालिका …