योग्य वयात व झटपट बनायचं आहे आई-बाबा? मग आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ सीक्रेट टिप्स एकदा ट्राय कराच..!

आताच्या स्त्रिया या पूर्वीच्या स्त्रियांसारख्या नाहीत. संसारापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला अधिक सक्षम आणि यशस्वी करून आपली स्वप्ने पूर्ण करणे यावर त्या भर देतात. ही गोष्ट जरी चांगली असली तरी याचा एक तोटा होतो तो आई होताना! करीयर आणि स्वप्नांच्या मागे धावताना वय मात्र वाढत जाते आणि अशावेळी संसार आणि आई होण्याची जबाबदारीचे भान राहत नाही. याशिवाय अजून एक गोष्ट आहे जी गरोदरपणा वा फर्टिलिटी वर परिणाम करते ती म्हणजे चुकीची लाइफस्टाइल होय. आजच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलचा अतिशय वाईट परिणाम फर्टिलिटी वर होतो आहे आणि यावर जाणकार सुद्धा चिंता व्यक्त करतात.

मंडळी तुम्ही स्त्री असाल वा पुरुष आणि कन्सिव्ह करण्यात तुम्हाला समस्या होत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे कारण या लेखात आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या कन्सिव्ह करण्यासाठी तुम्ही काय काय टिप्स फॉलो करू शकता आणि बॅंगलोरचे जीवोत्तमा आयुर्वेद केंद्राचे डॉ. शरद कुलकर्णी, एमएस (आयुर्वेद), (पीएच.डी.) वैद्य यांनी दिलेल्या काही खास टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कृत्रिमपणे आई वडील होण्याची गरज भासणार नाही.

आई होण्याची योग्य वेळ

जाणकारांच्या मते स्त्रीची प्रजननक्षमता ती जेव्हा 20 पेक्षा जास्त वर्षांची असते तेव्हा सर्वाधिक जास्त असते. तिच्या अंडाशयात असेलेले 90% एग्ज हे सुस्थितीत असतात. यामुळे या वयात स्त्री गरोदर राहण्याचे चान्सेस अधिक असतात. एका अभ्यासात हे दिसून आले आहे की वयाच्या 24 ते 26 व्या वर्षी झालेले गरोदरपण हे निरोगी आणि चांगले असते. या काळात स्त्री सहज गरोदर राहू शकते. तिला यासाठी जास्त प्रयत्न करणे सुद्धा लागत नाही. 4 पैकी 3 स्त्रिया आपल्या पहिल्याच प्रयत्नात या वयात गरोदर राहू शकतात. पण एकंदर पाहता वयाची 35 वर्षे ओलांडण्याआधी स्त्रीने आई होण्यावर भर द्यावा.

हेही वाचा :  तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स

(वाचा :- सचिन तेंडूलकरने मुलाला दिलं महाभारतातील ‘या’ योद्ध्याचं नाव, काय होता हे नाव निवडण्यामागचा उद्देश व कहाणी!)

आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला

जाणकार सांगतात की कन्सिव्ह करण्यासाठी मासिक पाळीच्या 10 व्या ते 20 व्या दिवसाच्या काळात खासकरून 14 व्या दिवशी संभोग करावा. यामुळे गरोदर राहण्यास जास्त मदत होते. जर नॉर्मली कन्सिव्ह करण्यात समस्या येत असेल तर अशावेळी आयुर्वेदिक उपायांवर भर द्यावा. पंचकर्म, विरेचन, वमन कर्म अशा उपायांनी खूप जास्त फायदा होऊ शकतो. शिवाय या उपायांचे साईड इफेक्ट्स सुद्धा नसतात. त्यामुळे आवर्जून हे उपाय अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने करून पहावेत.

(वाचा :- लाखो-करोडोंची मालकिन असलेल्या ‘या’ महिलेने स्वत:च्याच मुलांना दिलं असं आयुष्य, सर्वच पालकांसाठी मोठा धडा..!)

आनंदी रहावे

हा फर्टिलिटी निरोगी राखण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय आहे. कपल्स जेवढे खुश आणि आनंदी राहतील तेवढा त्याचा चांगला प्रभाव त्यांच्या प्रजननक्षमतेवर होतो आणि कन्सिव्ह करण्यास मोठी मदत होते. तुम्हाला सुद्धा माहित असेलच की जेवढा ताण घेतला किंवा जेवढं दु:खी राहील तर त्याचा वाईट परिणाम शारीरिक सुदृढतेवर आणि फर्टिलिटी वर होतो. त्यामुळे जास्तीत जास्त खुश राहावे जेणेकरून जलद कन्सिव्ह करण्यात मदत होईल.

हेही वाचा :  बीएमसी अधिकारी मारहाण प्रकरण; अनिल परब यांच्या अटकेबाबत कोर्टाचा निर्णय

(वाचा :- परदेशात सुद्धा ‘या’ इंडियन नावांसाठी दिवाने आहेत लोक, अशी युनिक व मॉर्डन भारतीय नावं जी इंग्रजांनाही खूप आवडतायत..!)

फर्टिलिटी वाढवणारे डाएट

फर्टिलिटी वाढविण्यासाठी काही खास डाएट फॉलो करावे. अक्रोड सारखे छोटेसे फळ सुद्धा तुम्हाला फर्टिलिटी वाढवण्यात मदत करू शकते. यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. जाणकार सुद्धा ज्या पुरूषांमध्ये फर्टिलिटी कमी आहे त्यांना रोज किमान 75 ग्रॅम अक्रोड खाण्याचा सल्ला देतात. स्त्रिया आणि पुरुष दोघांची फर्टिलिटी सुधारण्यामध्ये डाळ चांगली भूमिका बजावतात. डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉलिक अॅसिड असते. डाळींबासारखे साधेसुधे फळ सुद्धा फर्टिलिटी वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकते. डाळींबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्‍सीडेंट आढळतात जे शरीरातील टेस्‍टोस्‍टेरोनची लेव्हल वाढवतात, यामुळे पुरुषांची सेक्स ड्राईव्ह वाढते आणि स्पर्मच्या क्वालिटी मध्ये सुद्धा सुधारणा होते.

(वाचा :- लोखंडासारखी मजबूत व टणक बनतील मुलांची हाडे, फक्त खाऊ घाला ‘हा’ एकदम स्वस्तातला पदार्थ..!)

तिळाचा वापर

प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात फायब्रॉइड्सच्या समस्येला सामोरे जावे लागते. संयोजी पेशी आणि नरम स्नायू पेशी मिळून हे सिस्ट म्हणजेच गाठ तयार होते. यामुळे स्त्रीला गरोदर राहण्यास समस्या निर्माण होते. तीळ ही समस्या दूर करण्यास मदत करतात. याशिवाय ओवरीमध्ये अंडी योग्य प्रकारे रिलीज न झाल्यास देखील सिस्ट (गाठ) तयार होते. तीळ ही समस्या देखील दूर करतात. जर मेल पार्टनर मध्ये स्पर्म काउंट कमी असल्याने स्त्री गरोदर राहत नसेल तर त्या पुरुषाने सुद्धा तीळाचे आवर्जून सेवन करावे.

हेही वाचा :  परदेशात सुद्धा ‘या’ इंडियन नावांसाठी दिवाने आहेत लोक, अशी युनिक व मॉर्डन भारतीय नावं जी इंग्रजांनाही खूप आवडतायत..!

(वाचा :- अमेरिकेत प्रचंड पॉप्युलर आहेत मुलामुलींची ‘ही’ मॉर्डन व युनिक नावे, जी आता भारतातही होतायत प्रसिद्ध!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …