कव्वाली कार्यक्रमात मोहम्मद सिराजवर पैशांचा पाऊस, Video व्हायरल

Mohammed Siraj Qawwali Nights Video : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) दक्षिण आफ्रिकेत टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर सिराजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात सिराजवर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय. हा व्हिडिओ हैदराबादमधला असल्याचं सांगितलं जातंय. 

सिराजवर पैशांचा पाऊस
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. दोन कसोटी सामन्यात सिराजने तब्बल नऊ विकेट घेतल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये सिराजने तब्बल सहा विकेट घेतल्या होत्या. सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा सघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला. या कामगिरीनंतर घरी म्हणजे हैदराबादला पोहोचलेल्या सिराजचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कव्वाली नाईट्समध्ये सिराज सहभागी झाला होता. सिराज कव्वाल पार्टीबरोबर व्यासपिठावर बसलेला या व्हिडिओत दिसत आहे. यावेळी त्याच्यावर पैशांचा पाऊस पडतानाही दिसतोय. 

या व्हिडिओत सिराज कव्वालीचा आनंद घेताना दिसतोय. यावेळी काही व्यक्तीने त्याच्यावर नोटांचा पाऊस पाडला. सिराजचे मित्रही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गायकाने सिराजला आपल्या बाजूला बसण्याचंही आमंत्रण दिलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळणार
मोहम्मद सिराजने अगदी वेळेत भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. भारतासाठी सिराज आतापर्यंत 23 कसोटी, 41 एकदिवसीय आणि 10 टी20 सामने खेळला आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिराजने प्रत्येकी 68 विकेट घेतल्या आहेत. तर टी20त त्याच्या नावावर 12 विकेट जमा आहेत.

हेही वाचा :  नोकरदारांनो सावधान! कार्यालये, आस्थापनांच्या नाम पट्ट्या वाहनाच्या दर्शनी भागात लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारत आणि इग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश निश्चित मानला जातोय. 

पदार्पणाच्या तीन वर्षांनी खेळला दुसरा एकदिवसीय सामना
मोहम्मद सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नव्हती. विशेष म्हणजे या सामन्यानंतर पुढील तीन वर्षं त्याला संधी मिळाली नव्हती. सहा वर्षांनी 2022 मध्ये त्याने आपल्या करिअरमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला होता.  एकदिवसीय आयसीसी क्रमवारीत सिराजने पहिलं स्थानही पटकावंल होतं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …