त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले; माझ्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडीओ, राउतांचा दावा

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा हा कथित फोटो आहे.  या एका फोटो मुळे महाराष्ट्र पेटलेला आहे. अशातच माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा खळबळजनक दावा करत संजय राऊत यांनी बावनकुळे यांना इशारा दिला आहे. त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. 

 

पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. त्या फोटोत महाराष्ट्रातील नेता दिसतोय. मी कोणाचं नाव घेतलं नाही.जो व्यक्ती आहे त्यांनी ते सांगावं की तो मी नव्हेच म्हणून. किंवा पक्षाच्या लोकांनी सांगावं तसं. तेलगीने एका रात्रीत 1 कोटी उडवले हे माहिती होते. मकाऊ मध्ये  मात्र एक माणूस साडेतीन कोटी उडवतो म्हणजे खरेच अच्छे दिन आलेत. रेस्ट्राँरंटला जातत आणि साडे तीन कोटी उडवतात. साडे तीन कोटींचे तीन टप्प्यात कॉइन विकत घेतात. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजन घालू इच्छित नाही. महाराष्ट्रात काय सुरू आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. पण ते म्हणतात कुटुंबासोबत गेले होते. शेजारी बसलेले चायनीज फॅमिली आहे का? माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि व्हिडीओ देखील आहेत. तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे अजून उघडे पडाल. तुमच्याकडे भारतात ईडी सीबीआय असतील, आमच्याकडे मकाऊ मध्ये ईडी सीबीआय आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 
साडे तीन कोटी डॉलर्समध्ये व्यवहार झाले. नाना पटोले यांच्याशी सहमत आहे. टोळधाड बंद करा नाहीतर तुम्हाला दुकान बंद करावं लागेल. तीन तासात साडे तीन कोटी खर्च केलेत. कुटुंब खोलीत आहेत. आपण खाली आहात. कुटुंबाच्या गोष्टी करू नका. मी वैयक्तिक टीका करत नाही.  फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम होता तिथे, फुटबॉलपटू सोबत आहे तर काय? मोदी पितात तेच ते प्यायले. मोदींचा जो ब्रँड आहे तोच ब्रँड आहे.  मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच ते प्यायले असा खुलासा संजय राऊत यांनी अदित्य ठाकरे यांच्या फोटोवर केला. 

हेही वाचा :  ​घरबसल्या आधार कार्ड 'फ्री' मध्ये करा अपडेट, १४ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है… असं संजय राऊतांनी फोटो ट्विट करत म्हटलंय. राऊतांनी पुढे ट्विटमध्ये म्हटलंय…. मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण साडे तीन कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? दरम्यान हा फोटो खरा असेल तर त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. 

संजय राऊतांनी फोटो ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. आपण मकाऊमध्ये ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तिथला हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय. 

तर संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर… असं म्हणत बावनकुळेंचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो भाजपनं ट्विट केलेत.

हेही वाचा :  श्रीकांत शिंदेंकडून हल्ल्याची सुपारी? संजय राऊतांनी आरोप केलेला राजा ठाकूर आहे तरी कोण?

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका भाजप नेते मोहित कंबोज  यांनी केलीय. संजय राऊतांकडे आपले 25 लाख रूपये आहेत. आता त्यांनी त्या पैशातून स्वत:वर चांगले उपचार करवून घ्यावेत असंही कंबोज यांनी म्हंटलंय. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून …