रेमंडच्या मालकाचा संसार मोडला; घटस्फोटासाठी पत्नीने ठेवली एक अट, संपत्तीतील 75 टक्के हिस्सा…

Gautam Singhania Separation: रेमंड ग्रुपचे चेअरमॅन आणि भारतीय अरबपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या चर्चेत आहे. दोघांनीही लग्नाच्या 32 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने घटस्फोटासंबंधी एक मोठी अट समोर ठेवल्याचे समोर आले आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी पोटगी म्हणून कोटींची रक्कम सिंघानिया यांच्याकडे मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. 

देशातील दिग्गज बिझनेसमन आणि अरबपती गौतम सिंघानिया यांनी त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. गौतम सिंघानियाकडून ठाण्यात दिवाळीची पार्टी आयोजित केली होती. मात्र, या पार्टीत त्यांची पत्नी नवाज सिंघानिया या अनुपस्थित होत्या. त्यामुळं पहिल्यांदाच त्यांच्याच काही अलबेल असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गौतम यांनी ते वेगळे होत असल्याचे जाहिर केले होते. 

बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, नवाज मोदी सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया यांच्या एकूण संपत्तीतील 75 टक्के हिस्सा मागितला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांची मुलगी निहारिका आणि निशा आणि स्वतःसाठी ही रक्कम मागितली आहे. गौतम सिंघानिया यांनीही त्यांच्या संपत्तीतून हिस्सा देण्याबाबत टिप्पणी दिली आहे. 

हेही वाचा :  पुण्यातील फ्लॅटमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, गूढ कायम

रिपोर्टनुसार, गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या संपत्तीतील 11,620 कोटी रुपयांची संपत्तीतून त्यांच्या मुली आणि पत्नीसाठी 75 टक्के संपत्ती देण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यांने इतक्या मोठ्या रकमेचा फंड ट्रान्सफर करण्यासाठी फॅमिली ट्रस्ट बनवणयाची कार्यवाही सुरू केली आहे. सिंघानिया या ट्रस्टच्या मदतीने रक्कम आणि असेट ट्रान्सफर करणार आहेत. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, गौतम सिंघानिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परीवारातील सदस्यांना त्यांच्या संपत्तीतील वारसदार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांची पत्नी गौतम नवाज यांना हे मंजूर नव्हते. 

गौतम सिंघानीया यांनी 1999मध्ये सॉलिसिटर नादर मोदी यांची मुलगी नवाज मोदी यांच्यासोबत लग्न केले होते. घटस्फोटाच्या चर्चांवर मागील 13 नोव्हेंबर रोजी स्वतः सिंघानिया यांनी एक भावूक पोस्ट केली होती. त्यांनी म्हटलं आहे की, आमच्यासाठी यावर्षीची दिवाळी आधीसारखी नाहीये. एक दाम्पत्य म्हणून आम्ही 32 वर्ष एकत्र होतो. आई-वडिलांच्या भूमिकेत गेल्यानंतर आम्ही आणखी शिकत गेलो आणि एकमेकांना खंबीरपणे आधार देत होते. आता आम्ही दोघं वेगळं होत असलो तरी निहारीका आणि निशा सिंघानीया यांचे पालनपोषण आणि काळजी पहिलेसारखेच आम्ही करु. निहारीका आणि निशासाठी जे चांगलं असेल ते आपण करु, असं गौतम यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून …