रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा

Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजपासून  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला सुरुवात करत आहेत. पंतप्रधान म्हणाले की मला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आहे. यासोबत त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये जिजाऊंचा देखील उल्लेख केला आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. ‘अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. प्राणप्रतिष्ठा करताना भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मला एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. मी तुम्हा सर्वांचे, जनतेचे आशीर्वाद मागत आहे. यावेळी माझ्या भावना शब्दात मांडणे खूप अवघड आहे, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  भाऊराव कऱ्हाडेंचा टीडीएम 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज

“दैवी आशीर्वादामुळेच जीवनातील काही क्षण प्रत्यक्षात येतात. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र भगवान श्री राम भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांनी रामनामाचा जप सुरू आहे.  प्रत्येकजण 22 जानेवारीच्या त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची वाट पाहत आहे. या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मलाही मिळत आहे हे माझे भाग्य आहे. हा माझ्यासाठी अकल्पनीय अनुभवांचा काळ आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने मला एक साधन बनवले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.’निमित मातरम् भव सव्य-सचिन’. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या शास्त्रातही सांगितले आहे की, भगवंताच्या यज्ञासाठी आणि उपासनेसाठी आपण स्वतःमध्ये दैवी चैतन्य जागृत केले पाहिजे. यासाठी धर्मग्रंथात उपवास आणि कठोर नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करण्यापूर्वी अभिषेक करावा लागतो. त्यामुळे मला आध्यात्मिक प्रवासातील काही तपस्वी आणि महापुरुषांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि त्यांनी सुचविलेल्या यम नियमानुसार मी आजपासून 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा :  Viral Video : महिलांनो सावधान! 'या' शहरात फिरतोय Serial Kisser

यासोबत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईचीही आठवण काढली. माझी आई आयुष्याच्या शेवटपर्यंत जपमाळ जपताना सीता-रामाचे नाव जपत होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांच्या ऑडिओ मेसेजच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी तीनदा जय सियाराम म्हटले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …