Ayodhya Ram Mandir : ‘मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे’; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?

Ram Mandir News in Marathi :  अयोध्या मंदिरात रामाललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येसह देशभरात जय्यत तयारी सुरु असून हा सोहळा संस्मरणीय बनवण्यात येईल. 

देशातील आणि जगातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रे पाठवली जातात. निमंत्रण पत्रासोबत संकल्प नावाची पुस्तिकाही देण्यात आली आहे. या पुस्तिकेत देवराह बाबाची छायाचित्रे छापण्यात आले. सध्या ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

देवराहा तेच बाबा आहेत ज्यांनी 1992 मध्ये पूर्व अलाहाबादमध्ये एका सभेत राम मंदिर उभारण्याचे भाकित केले होते. देवराह बाबा पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले  होते, ‘राम मंदिर नक्कीच बनणार आहे. राम मंदिराच्या उभारणीत कोणीही अडथळा निर्माण करणार नाही. सर्वांच्या सहकार्याने मंदिर उभारले जाईल. देवराह बाबांचे 33 वर्षांपूर्वीचे हे भाकीत आज महत्त्वाचे ठरत आहे.

देवराह बाबा 250 वर्षांहून अधिक जगले!

देवराह बाबा फार प्रसिद्ध होते. अशातच पंतप्रधान राष्ट्रपतींकडे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजेंद्र प्रसाद, लालू प्रसाद यादव आणि देशातील आणि जगातील सर्व दिग्गज हे बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असत. त्यांना चमत्कारी बाबा असेही म्हणतात. भारतातील दैवी संतांपैकी एक मानले जाते. देवराह बाबा कुणालाही काहीही न विचारता सर्वांचे सगळं माहीत असायचे. 
मथुरेतील यमुना नदीच्या काठी वसलेल्या त्यांच्या आश्रमात ते राहत होते. तेथे 12 फूट उंच लाकडी मचानातून ते भाविकांना दर्शन देत असे. साधारणपणे अंगावर कापडाचा एकच तुकडा घातला जात असे. बाबांच्या वयाबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. काही अनुयायांचा असा विश्वास आहे की बाबा 250 वर्षांहून अधिक काळ जगले. काही समर्थक म्हणतात की ते 500 वर्षे जगले. 

हेही वाचा :  बहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ

बाबांना देवराहा नाव कसे पडले?

देवराह बाबा हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील नदौली गावचे रहिवासी होते. देवरिया जिल्ह्यामुळे त्यांना देवराह बाबा म्हणून ओळखले जात असे. देवरीत अजूनही बाबांचा आश्रम आहे. देवराह बाबा आश्रमाचे महंत श्याम सुंदर दास यांना अयोध्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आमंत्रण मिळाल्यावर महंत श्याम सुंदर दास म्हणाले, ‘बाबा देवराहांनी 33 वर्षांपूर्वी सांगितले होते की, त्यांची मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण होईल. सर्वजण मिळून काम पूर्ण करतील. ज्या महापुरुषाच्या आशीर्वादाने राम मंदिर बांधले गेले, त्यांचे जीवन आता तेथेच पावन होणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …