30 डिसेंबर हा दिवस अयोध्यावासियांच्या लक्षात राहणार, पंतप्रधानांच्या उपस्थितीत नेमकं काय होणार?

Ayodhya Airport Inaugration: अखेरच्या टप्प्यात आलेल्या राम मंदिराच्या बांधकामाचा आढावा संपूर्ण देशानं घेतला आणि आता या मंदिरासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी माहिती तितक्याच आत्मियतेनं जाणून घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. नव्या वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला अखेर राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवसासाठी सध्या अयोध्यानगरी सज्ज होताना दिसत असून दर दिवशी शहर कात टाकत असल्याचाच भास होत आहे. प्राणप्रतिष्ठेचा दिवस अनेकांसाठीच बहुमुल्य असला तरीही 30 डिसेंबर 2023 हा दिवससुद्धा अयोध्यावासियांसाठी अतीव खास आणि अविस्मरणीय असणार आहे. 

अयोध्येला संपूर्ण जगाशी जोडू पाहणारे अनेक प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी अयोध्येत उपस्थित राहणार असून, भव्य स्वरुपातील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यामध्ये अनेक प्रकल्पांच्य़ा लोकार्पणासह अयोथ्येतील विमानतळाच्या उदघाटन सोहळा (Ayodhya Airport), रेल्वे स्थानकाचं (Ayodhya Dham Railway Station) उदघाटन आणि दोन अमृत भारत रेल्वेंना (Amrit Bharat Train) हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. 

कसा असेल पंतप्रधानांचा अयोध्या दौरा? 

30 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी अयोध्यानगरीत येणार आहेत. इथं सकाळी 11.15 वाजता ते पुनर्बांधणी करण्यात आलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचं उदघाटन करतील, तिथंच ते दोन नव्या अमृत भारत रेल्वेगाड्या आणि 6 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. काही इतर रेल्वे प्रकल्पांचंही ते इथूनच लोकार्पण करतील. 

हेही वाचा :  अंबानी किंवा टाटा नाही तर 'ही' व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

पंतप्रधान मोदी अयोध्येतून 6 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार असून यामध्ये श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली, अयोध्या – आनंद विहार टर्मिनल वंदे भारत, अमृतसर-दिल्ली वंदे भारत, कोईंबतूर – बंगळुरु कँट वंदे भारत , मँगलोर -मडगाव वंदे भारत, जालना – मुंबई वंदे भारत या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. 

 

30 डिसेंबरला पंतप्रधान दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी अयोध्येत उभारण्यात आलेल्या विमानतळाचं उदघाटन करतील. तब्बल 1450 कोटी रुपयांच्या खर्चातून तयार करण्यात आलेल्या या विमानतळाता पहिला टप्पा सध्या वापरासाठी तयार असून, या विमानतळामुळं अयोध्येत पोहोचणं आणखी सुकर होणार आहे. उदघाटनानंतर याच दिवशी विमानतळावर इंडिगो अहमदाबादच्या वतीनं अयोध्या आणि दिल्ली ते अयोध्येसाठीच्या उड्डाणांचीही सुरुवात करण्यात येणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …