बहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ

Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भावानेच बहिणीची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने बहिणीचं शीर कापूर धडावेगळं केलं. यानंतर तो हे शीर हातात घेऊन बाहेर रस्त्यावर पडल्यानंतर लोकांची एकच धावपळ सुरु झाली. आरोपी हे शीर घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. 

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील फतेहपूर परिसरात असणाऱ्या मिठवारा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. रियाज असं 22 वर्षीय आरोपीचं नाव असून, त्याने आपल्या 18 वर्षीय बहिण आशिफाची निर्दयीपणे हत्या केली. हत्येआधी दोघांमध्ये मोठा वाद झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाजने धारदार शस्त्राने बहिणीची हत्या केली. नंतर त्याने तिचं शीर कापलं आणि नंतर ते हातात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने चालला होता. पण पोलिसांनी त्याआधीच त्याला अटक केली. 

आशिफाचे तिच्याच गावातील तरुण चांदबाबूशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासह पळून गेली होती असं अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे. आशिफाच्या कुटुंबाने यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी आशिफाला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाकडे सोपवलं होतं. तसंच चांदबाबूची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलं आहे.  

हेही वाचा :  मुलगा होत नसल्याने पतीने पत्नीला संपवलं; बाईकवरुन पडल्याने मृत्यू झाल्याचा रचला बनाव

दरम्यान, रियाजला अटक केल्यानंतर पोलिसांचं एक पथक ज्या ठिकाणी हत्या झाली तिथे पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळी गेल्यानंतर सर्व पुरावे गोळा केले आहेत. तसंच शीर नसलेला मृतदेहही ताब्यात घेतला आहे. मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती आशुतोष मिश्रा यांनी दिली आहे. 

रियाजच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीच्या नात्याला विरोध होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून …