तुम्हीही मित्रांसोबत शेअरिंगमध्ये Netflix वापरता, यापुढे असं करता येणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : Netflix चं पासवर्ड शेअरिंग फीचर बंद होणार असल्याच्या चर्चांना गेले कित्येक दिवस उधाण आलं आहे. अशामध्ये आता फायनली कंपनीकडून भारतात पासवर्ड शेअरिंग बंद करण्यात आलं आहे. नवीन धोरणानुसार, कोणताही वापरकर्ता त्याचा आयडी पासवर्ड त्याच्या मित्रांसह किंवा लांब राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींसह देखील शेअर करू शकणार नाही. कंपनीने हा निर्णय घेण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे अजूनही बहुतेक वापरकर्ते त्यांच्या मित्रांसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्रितपणे शेअरिंगवर नेटफ्लिक्स चालवतात, अशा परिस्थितीत कंपनीच्या कमाईवर खूपच परिणाम होतो. दरम्यान नव्या या नियमांबद्दल जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगत आहोत…
नेटफ्लिक्सने भारतात पासवर्ड शेअरिंग केले बंद
Netflix खाते आयडी पासवर्ड शेअरिंग बंद करण्यात आले आहे. यावेळी कंपनीने म्हटले आहे की खाते शेअरिंग फक्त एकाच घरात करु शकणार आहात. म्हणजेच, जर तुम्ही एकाच ठिकाणी एकत्र राहत असाल तर तुम्ही तुमचे खाते तेथील लोकांशी शेअर करू शकता. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या घराच्या ठिकाणी नोंदणीकृत Netflix खाते वापरत असाल, तर तुमचे डिव्हाइस महिन्यातून एकदा तरी तुमच्या होम लोकेशनशी कनेक्ट होणे आवश्यक आहे. केवळ असे केल्याने तुम्ही तुमचे Netflix खाते वापरु शकाल. होम लोकेशनशी कनेक्ट होण्य़ासाठी आयपी अॅड्रेसची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हे करू शकत नसाल किंवा तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त काळ कुठेतरी जात असाल, तर तुम्हाला आता नेटफ्लिक्ससाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

हेही वाचा :  मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस

तसंच जर तुम्ही तुमच्या मित्राचे खाते वापरत असल्यास, तुम्हाला दुसरे खाते तयार करण्यास किंवा तुमच्या घराचे लोकेशन अपडेट करण्यास सांगितले जाईल. हे नवीन धोरण २० जुलैपासून लागू करण्यात आले आहे. हळूहळू देशभरात हे लागू होणार आहे. Netflix वापरकर्त्याचे प्राथमिक लोकेशन त्यांचा IP अॅड्रेस, डिव्हाइस आयडी, वाय-फाय नेटवर्क आणि अकाऊंटच्या अॅक्टिव्हिटीद्वारे ट्रॅक करेल. युजर्सना लवकरच या नवीन पॉलिसीबद्दल सर्व काही सांगितले जाईल. यासाठी कंपनीने यूजर्सना मेल देखील करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : iPhone 15 नंतर लगेचच लाँच होणार गुगलचा Pixel 8 Pro, फीचर्स झाले लीक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विल्यम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधनं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …