लघ्वी होताना जळजळ होत असेल तर डाएटमध्ये करा असे बदल

बरेचदा लघ्वी होताना काही जणांना जळजळ होण्याचा त्रास होतो. पण याकडे दुर्लक्ष करता कामा नये. लघ्वी करताना जळजळ होत असेल तर वेळीच याकडे लक्ष देऊन आहारात योग्य तो बदल करावा. UTI मुळे लघ्वी करताना जळजळ होऊ शकते. योग्य उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यासह नियमित आहारात बदल केल्यास, यापासून तुमची सुटका होऊ शकते. मग प्रश्न असा येतो की आहारात बदल करायचा म्हणजे नक्की कोणत्या गोष्टीचा समावेश करायचा? तर अशाच काही पदार्थांबाबत या लेखातून आम्ही माहिती देत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)

​UTI म्हणजे काय?​

uti-

युरिन इन्फेक्शन म्हणजे UTI. ८० टक्के महिलांमध्ये अधिक काळ लघ्वी रोखल्याने हे दिसून येते. पुरुषांमध्येही युटीआयटी समस्या असते. मुत्राशयामध्ये जेव्हा बॅक्टेरिया जमा होतात, तेव्हा ते युरिनमार्फत इन्फेक्शन युट्रसपर्यंत पोहचते आणि त्यामुळे लघ्वी करताना जळजळ होणे अधिक निर्माण होते. मात्र आहारातील बदल करून तुम्ही हे रोखू शकता.

​क्रॅनबेरी ज्युस​

​क्रॅनबेरी ज्युस​

UTI चा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात क्रॅनबेरी ज्युसचा वापर करू शकता. साधारण आठवडाभर तुम्ही नियमित क्रॅनबेरीचा ज्युस प्यायल्यास लघ्वी करताना होणारी जळजळ थांबण्यास मदत मिळेल. क्रॅनबेरीमधील पोषक तत्व बॅक्टेरिया कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.

हेही वाचा :  Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

(वाचा – स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, तज्ज्ञांकडून सखोल माहिती)

​दह्याचे सेवन​

​दह्याचे सेवन​

दही हे पोटासाठी थंडावा निर्माण करते हे सर्वांनाच माहीत आहे. तर दह्यातील प्रोबायोटिकमुळे लघ्वी करताना होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे तुम्ही नियमित आहारात दह्याचा समावेश करून घ्यावा आणि याचे सेवन करावे. मुत्राशयाच्या मार्गात संक्रमण होण्यापासून दही बचाव करते.

(वाचा – पोटात जाताच हे ४ पदार्थ वाढवतात LDL Cholesterol, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक)पोटात जाताच हे ४ पदार्थ वाढवतात LDL Cholesterol, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक​

​भरपूर पाणी प्या​

​भरपूर पाणी प्या​

तुमच्या शरीराला किमान दिवसाला ८-९ ग्लास पाण्याची आवश्यकता भासते. एका रिसर्चनुसार, तुम्ही अधिक पाणी प्यायल्यास, UTI च्या या समस्येपासून सुटका मिळवू शकता. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जाण्यास मदत होते आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन लघ्वी करताना जळजळ होत नाही.

(वाचा – लहान वयातच मासिक पाळी थांबविण्याची मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया नक्की काय आहे, कोणासाठी आहे ही ट्रीटमेंट)

​विटामिन सी चा समावेश​

​विटामिन सी चा समावेश​

तुमच्या आहारात विटामिन सी युक्त फळांचा समावेश करून घ्या. लघ्वी होताना जळजळ होत असेल तर विटामिन सी पदार्थ खाल्ल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. यातील घटक शरीराला थंडावा देऊन उष्णता कमी करतात.

हेही वाचा :  मराठा आरक्षणाच्या वादात मोठा ट्विस्ट; अजित पवार यांचे मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज

​लसूण​

​लसूण​

आहारात लसणाचा समावेश करून घ्या. लसूणमध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट गुण आणि सल्फर हे शरीरातील डिटॉक्सिफिकेशनसाठी अत्यावश्यक ठरते. त्यामुळे लघ्वीतील जळजळीची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही १-२ कच्च्या लसूण चावून खाल्ल्यासदेखील उपयोगी ठरू शकते.

​ताजी फळं आणि भाजी​

​ताजी फळं आणि भाजी​

ताज्या फळं आणि भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक सापडतात आणि यातून विटामिन्सची योग्य गरज शरीराला फायदा करून देते. त्यामुळे युटीआय संक्रमणाचा त्रासही होत नाही.

टीप – ही माहिती आम्ही सामान्य वाचनावरून दिली आहे. तुम्हाला असा त्रास होत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करावेत.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …