भारत- न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर

India Tour Of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) खेळला जाणार आहे. क्राइस्टचर्चमधील (Christchurch) हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) स्टेडियमवर दोन्ही संघात लढत होणार आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, केन विल्यमसन न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत किवीज संघ 1-0 नं आघाडीवर आहे.

भारत-न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 307 धावांचा पाठलाग करताना टॉम लॅथमनं नाबाद 145 धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या डावातील 13 व्या षटकात पावसाला सुरुवात झाली आणि सामना रद्द करण्यात आला. 

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 112 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यात आले. यापैकी 55 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडच्या संघाला 50 सामन्यात विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडच्या मैदानावर भारताला 26 वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. 

हेही वाचा :  न्यूझीलंडला हरवलं अन् इतिहासही रचला; टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा खास पराक्रम








एकदिवसीय क्रिकेट एकूण सामने भारतानं जिंकलेले सामने न्यूझीलंडच्या संघानं जिंकेलेले सामने
आतापर्यंत 112 55 50
हॅग्ले ओव्हल मैदानावरील रेकॉर्ड 0 0 0
अखेरचे पाच सामने 5 0 4
न्यूझीलंड दौऱ्यावर 44 14 26

हे देखील वाचा-

News Reels

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …