संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित झा’ आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!

Parliament Attack : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून काही तरुणांनी (Parliament Breach Accused) उड्या मारल्या अन् सभागृहात पिवळ्या रंगाचा वायू सोडला. सभागृहाच्या बाकावर उड्या मारत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दैना उडवली. या प्रकरणात चार नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीलम, मनोरंजन, सागर आणि अमोल शिंदे यांचा समावेश आहे. तर पाचवा आरोपी ललित झा हा अद्याप फरार आहे. संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड हा पळून गेलेला ललित झा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, हा ललित झा (Lalit Jha) आहे तरी कोण? असा सवाल आता विचारला जातोय.

संसदेतील सुरक्षेतील त्रुटींचा व्हिडिओ

अटक केलेल्या चार आरोपींचे फोनही ललितकडे असल्याचं बाकीच्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर आता ललितचा शोध घेणं सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. त्याचं शेवटचं ठिकाण राजस्थानमध्ये सापडलंय. त्यानंतर त्याचं कोलकाता कनेक्शन देखील समोर आलंय. ललित सध्या पश्चिम बंगालमधील एका एनजीओशी जोडला गेलाय. तो या एनजीओशीमध्ये सरचिटणीस पदावर आहे. ललित झा याने एनजीओचे संस्थापक नीलाक्ष आइच यांना संसदेतील सुरक्षेतील त्रुटींचा व्हिडिओही व्हॉट्सअँपवर शेअर केला होता. नीलाक्ष यांच्या मदतीने पोलिसांनी आता शोधाशोध सुरू केली आहे. चार आरोपींनी ललित झा यांच्या सांगण्यावरून स्मोक कलर हल्ल्यासाठी 13 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती.

हेही वाचा :  Neeraj Grover Murder Case: एक अभिनेत्री, तिचा बॉयफ्रेंड अन् नीरज… त्या शेवटच्या रात्री नेमकं काय घडलं?

ललित झा हा सेंट्रल कोलकाता येथील गिरीश पार्क येथे एका घरात राहत होता. त्याचे वडील पंडित आहेत. कोविडनंतर, त्यानं येथं राहणं बंद केलं होतं. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा कोणालाही सापडला नाही. ललित झा याने कलर हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याची माहिती समोर आलीये. 

आणखी वाचा – Parliament Breach: चार नाही सहा जण, सोशल मीडियावर भेटले… असा बनला 13 डिसेंबरचा प्लान

दरम्यान, लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारा आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा आहे. तसेच संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. लखनऊ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर सागर शर्मा हा भगत सिंग यांना आपला आदर्श मानत होता. सामान्य घरातील असलेला सागर सरकारच्या आणि हिंदू धर्माविरुद्ध वारंवार पोस्ट लिहित होता, अशी माहिती लखनऊ पोलिसांनी दिली आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …