भाऊराव कऱ्हाडेंचा टीडीएम ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज

TDM: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित, आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या ‘टीडीएम’ (TDM) चित्रपटाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, कारण येत्या 28 एप्रिल 2023 ला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 

टीडीएम चित्रपटाचं पुन्हा एकदा चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा पोस्टर समोर आला असून चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले. लवकरच याचा उलगडाही होणार आहे.  ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर  कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत.  चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत  निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी पेलवली आहे. ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित ‘टीडीएम’ हा दर्जेदार विषय 28 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

वास्तविकतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाचा मुख्य नायकाचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही. त्यामुळे चित्रपटात कोण कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र जास्त विलंब न करता काही दिवसातच याचाही उलगडा होणार आहे. चित्रपटाची कथा इमोशनल वा प्रॅक्टिकल नेमकी कुठे वळण घेणार यातही अद्याप दुमत आहे, त्यामुळे चित्रपटात विशेष असे काय असणार याचा अंदाज लागत नाही आहे. या चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशनची जबाबदारी UFO Movies सांभाळत आहे.

हेही वाचा :  Elon Musk ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार? कारण वाचून सगळेच झाले हैराण

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. चित्रपटाचा पोस्टर पाहून रसिक प्रेक्षकांना 28 एप्रिल 2023 ची उत्सुकता लागून राहिली असेल, यांत शंकाच नाही. तर लवकरच हा सिनेमा मोठया पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 2 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …