Yuvraj Singh Letter to Virat Kohli: युवराज सिंगच्या पत्राला कोहलीचं उत्तर, म्हणाला…

Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले. यावेळी युवराजने एक भावनिक पत्र देखील लिहिलं असून हे सारं त्याने सोशल मीडियावर शेअर केलं. ज्यानंतर आता विराटने त्याच्या इन्स्टावर त्याचा आणि युवराजचा एक फोटो शेअर करत धन्यवाद देत खास पोस्ट लिहिली आहे.

आधी युवराजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. यात सोन्याचे शूज, लेटर आणि युवराजचा विराटसोबतचा एक जुना फोटो युवीने शेअर केला होता. युवराजने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विराटबाबत भावनिक पत्र लिहित तू किंग कोहली असलास तरी आमच्यासाठी आमचा चीकू राहशील असं लिहिलं होतं. ज्यावर आता विराटने लिहिलं आहे की, ”या सर्वासाठी धन्यवाद, यूवी पा. असं गिफ्ट अशा व्यक्तीकडून येणं ज्याने पहिल्या दिवसापासून माझी कारकिर्द पाहिली आहे, हे फार खास आहे. तुझं जीवन ज्यामध्ये कॅन्सरवर मात करत तू क्रिकेट कायम खेळलास, हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.” पुढे विराट म्हणाला,”मला माहित आहे तू किती मोठ्या मनाचा आहेस. जवळच्या लोकांची किती केअर करतोस. आता आपण दोघंही पालक आहोत आणि हे एका आशिर्वादाप्रमाणे आहे. तुला सर्व आनंद आणि आशिर्वाद मिळो हीच माझी प्रार्थना आहे.” 

हेही वाचा :  तिसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंड 160 धावांवर सर्वबाद, कॉन्वे-फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत सावरला डाव

विराटकडे सर्वांचं लक्ष

युवराज सिंग आणि विराट कोहली यांची मैत्री बरीच जुनी आणि पक्की आहे. विराटने नुकतंच संघाचं कर्णधारपद सोडलं असून तो त्याची शंभरावी कसोटी आता श्रीलंका संघाविरुद्ध खेळणार आहे. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत विराटकडे अनेकांचे लक्ष असेल. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची ही पहिलीच कसोटी असणार आहे. दरम्यान त्याच्या शतकाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …