Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान गारपीट; राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं

Maharashtra Unseasonal Rain : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे.  पुणे जिल्ह्यात तुफान गारपीट झाली आहे.  मावळमध्ये गारपीटीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले आहेत. तर, सिंहगड रस्ता परिसरात पाणी साचल्यानं पुणेकरांची तारांबळ उडाली आहे (Pune Rain). 

पवना धरण परिसरात गारांचा पाऊस

मावळ तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस पडत आहे. मात्र आज पवना धरण परिसरात गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या गारांच्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. तर, अनेकजण गारा वेचण्यासाठी नागरिक या पावसाचा आनंद घेत होते. सध्या उन्हाळ्यात पाऊस चालू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तर, उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार गारपीटीच्या अवकाळी पावसाने झोडपले. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.  गहू, कांदा द्राक्ष यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार बसणार असल्याने  बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.

हेही वाचा :  शौचाच्या जागी गाठ व ब्लीडिंग होते? मुळव्याध आहे की कोलोरेक्टल कॅन्सरची सुरूवात, असा ओळखा दोन्ही लक्षणांतला फरक

वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वाशिमच्या मालेगाव, मंगरुळपिर व मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तर, जिल्ह्यातील मुंगळा कंझरा,चांबई फाटा, येडशी, शेलुबाजार परिसरातील गारपीटी झाल्याने शेतात असलेले शेतकऱ्याचे गहु, हरभरा, उन्हाळी मूग, बिजवाई कांदा, तीळ, ज्वारीच्या उभ्या पिकांसह भाजीपाला व फळबागांचे गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

अकोल्यात गारपीटीचे थैमान

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पाटसुल येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा थैमान घातले आहे. मागील दोन दिवसांपासून पातूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा गारपिट झाल्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत सापडला आहे. अचानक रविवारी दुपारी गारांचा पाऊस पडल्याने शेतीच मोठं नुकसान झाले आहे. या परिसरातील फळबाग आणि भाजीपालाला याचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत.

नुकसानीचे पंचनामे करुन तातडीनं मदत करावी

अकोला जिल्ह्यात झालेल्या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. 5 हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झाले. गहू ,कांदा ,टरबूज ,पपई , लिंबू तसंच भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झाले. आतापर्यंत अवकाळी पावसामुळे 16 जनावरं दगावली आहेत तर 46 घरांचंही मोठं नुकसान झाले. सर्वाधिक फटका अकोल्याच्या पातूर तालुक्याला बसलाय.. सरकारने नुकसानीचे पंचनामे करुन तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

हेही वाचा :  ठाणे जिल्हा सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून ५२७ कोटीचा निधी मंजुर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …