शौचाच्या जागी गाठ व ब्लीडिंग होते? मुळव्याध आहे की कोलोरेक्टल कॅन्सरची सुरूवात, असा ओळखा दोन्ही लक्षणांतला फरक

गुदद्वारात गाठ येणे आणि पोट साफ करताना किंवा शौचाला बसल्यावर रक्त पडणे ही मूळव्याधाची (Piles) सामान्य लक्षणे आहेत. पण ही कोलोरेक्टल कॅन्सरची देखील सुरूवातीची लक्षणे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? मोठे आतडे (कोलन) किंवा गुदद्वारातून (रेक्टम) या दोन अवयवांतून विकसित होणाऱ्या कर्करोगाच्या आजाराला कोलोरेक्टल कॅन्सर असे म्हणतात.

कोलोरेक्टल कॅन्सर की मूळव्याध? कोलोरेक्टल कॅन्सर आणि मूळव्याध या दोन आजारांत अनेक लक्षणे ही सारखीच आहेत. त्यामुळे बहुतेक लोक या कर्करोगाला सुरुवातीला मुळव्याधच समजतात आणि समस्या गंभीर बनत जाते. परंतु अशी काही लक्षणे आहेत जी कोलन किंवा रेक्टल कॅन्सरमध्ये अधिक सामान्य असतात जी वेळीच समजल्यास उपचार करून पुर्णत: बरे होता येते. (फोटो सौजन्य :- iStock)

गुदद्वाराच्या आत किंवा शौचाच्या जागी गाठ येणे

गुदद्वाराच्या आत किंवा शौचाच्या जागी गाठ येणे

आतड्याचा आणि गुदाशयाचा कर्करोग असो किंवा मुळव्याध असो, दोन्ही आजारांमध्ये गुदद्वाराच्या आत गाठ जाणवते. या स्थितीत गाठीसोबतच खाज आणि वेदना यांचा सुद्धा सामना करावा लागतो. अशावेळी अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचाराला सुरुवात करा.

हेही वाचा :  बिस्किटात का असतात छिद्र? फक्त डिझाइन नाही तर त्यामागचं कारण महत्वाचं

(वाचा :- डायबिटीज व कॅन्सरचा धोका 100% वाढवतात हे 5 पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची अजिबात करू नका चूक – डॉक्टरांचा सल्ला)​

ब्लीडिंगचा रंग असतो एकसारखाच

ब्लीडिंगचा रंग असतो एकसारखाच

मुळव्याध आणि गुदाशयाचा कर्करोग दोन्ही गुदद्वाराच्या शेवटच्या भागापासून सुरू होतात. दोन्ही समस्यांमध्ये, शौचाला बसल्यावर किंवा त्यानंतर रक्तस्त्राव होतो. जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या मते, दोन्ही कारणांमुळे हलका लाल रक्तस्त्राव होतो. जर कॅन्सर आतड्याच्या आत झाला असेल तर त्याचा रंग गडद लाल असू शकतो.

(वाचा :- Diabetes Symptoms : हे 6 अवयव ओरडून सांगतात तुम्हाला झालाय डायबिटीज, लक्ष न दिल्यास Blood Sugar चा होईल स्फोट)​

पोटदुखी सुद्धा आहे महत्त्वाचे लक्षण

पोटदुखी सुद्धा आहे महत्त्वाचे लक्षण

जॉन हॉपकिन्सच्या मते, जर सतत पोट फुगणे, पोटदुखी, पोटात क्रॅम्प्स किंवा गोळा येणे इत्यादींसोबतच ब्लीडिंग होत असेल तर ते कोलोरेक्टल कॅन्सरचे थेट लक्षण असू शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून निदान करून घ्यावे. कारण, मूळव्याधामध्ये या समस्यांचा धोका नगण्य असतो. मुळव्याधची लक्षणे दिसतात आणि नाहीशी होतात, परंतु या कॅन्सरची लक्षणे कायम राहतात.

(वाचा :- लघवीत जळजळ झाल्यास समजून जा तुम्ही केली आहे ही मोठी चूक, किडनी, पोट, आतड्यांत जमा झालाय विषारी पदार्थांचा साठा)​

हेही वाचा :  मुंबईत एकही डास दिसणार नाही; BMC ने प्लानच असा जबरदस्त बनवलाय की...

अचानक वजन कमी होणे

अचानक वजन कमी होणे

मुळव्याधात वजन कमी होणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलता. पण गुदाशय आणि आतड्याच्या कॅन्सरमध्ये अचानक वजन कमी होते आणि तुम्ही अशक्त होत जाता. तेही जेव्हा तुमची खाण्याची सवय पूर्वीसारखीच असते तरीही, म्हणून असे अचानक वजन कमी होऊ लागले तर तो एक संकेतच समजावा आणि उपचारासाठी दाखल व्हावे.

(वाचा :- शास्त्रज्ञांचा अजब दावा – अंड्याचा हा एक भाग आहे अत्यंत विषारी, या 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत Eggs)​

डॉक्टरांकडे कधी जावे?

डॉक्टरांकडे कधी जावे?

पोट साफ होताना रक्तस्त्राव किंवा पोटदुखी होणे हे मूळव्याधाचे सामान्य लक्षण आहे. पण, त्यामागील कारण काहीही असो, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे मुळव्याध किंवा कर्करोग गंभीर होण्यापासून वेळीच रोखता येईल आणि तुमचा जीव देखील बचावेल.
(वाचा :- Fact Check: हे ड्रिंक प्यायल्याने एका झटक्यात बाहेर पडतो मुतखडा व पित्ताशयाचा खडा, काय आहे या दाव्यामागील सत्य)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईड नसा आतून पोखरते व पूर्ण रक्त आटवते, हार्ट व ब्रेन अटॅक येण्याआधी सुरू करा हे उपाय

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …