आयपीलमध्ये गुजरात दिल्ली मॅचपेक्षा ‘या’ फोटोचीच होतेय चर्चा, बनवले जातायत मिम्स, काय आहे कारण?

IPL Viral Kissing Photo : गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जोडपे होते. खरंतर, या जोडप्यांना मॅचमध्ये काडीचा इंटरेस्ट व्हता. हे दोघे एकमेकांतच गुंग असताना सामन्या दरम्यान, ही जोडी रोमँटिक मूडमध्ये होती. आणि त्यातच या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले. मग अचानक कॅमेरा फिरला आणि ही जोडी काही मिनिटांसाठी टीव्ही स्क्रीनवर या अवस्थेत दिसली. आता या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्स त्यांच्यावर मजेशीर मिम्सदेखील बनवत आहेत.

दिल्लीच्या डावात कॅमेऱ्यात कैद झालेल्या या जोडप्याने शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात हे दृश्य दाखवले. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुजरात टायटन्सने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. पृथ्वी शॉ आणि मनदीप सिंग क्रीजवर उपस्थित होते. दिल्लीच्या संघाने चार षटकांत एक विकेट गमावून 32 धावा केल्या होत्या. सामन्या दरम्यान जेव्हा ब्रेक झाला तेव्हा फक्त हे जोडपे पडद्यावर दिसले.

सोशल मीडियावर या जोडप्याचे चुंबन घेतानाचा फोटो काल रात्रीपासून व्हायरल होत आहेत. यावर अनेक मिम्स बनवले जात आहेत. काहींनी आयपीएलला ‘किस कॅम’ सुरू करण्याचा सल्लाही दिला आहे. खरंतर, एनबीए मॅचेसमध्ये अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा कॅमेरा कपल्सकडे जातो तेव्हा ते किस करायला लागतात. असेच काहीसे या जोडीचेही होते. यावर सोशल मीडिया यूजर्स लिहित आहेत की, भारत आता खरोखरंच ग्लोबल झाला आहे.

हेही वाचा :  आगामी आयपीएलपूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज

 

महत्वाच्या बातम्या : 

CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या…

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …