प्रपोज हे गुडघ्यावर बसूनच का केलं जातं, कारण ऐकल्यावर डोकं अक्षरश: हलेल, विसराल इतर पद्धती

प्रेमाचा महिना फेब्रुवारी त्याच्या सर्वात सुंदर दिवसांतून जात आहे. Rose Day पासून सुरू होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकचा आज दुसरा दिवस आहे. 8 फेब्रुवारी हा दिवस जगभरात Propose Day 2023 म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमात पडलेली प्रत्येक व्यक्ती जोडीदाराला त्याच्या मनातील भावनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याकडून एकत्र जीवन व्यतीत करण्याची संमती मिळेल ही अपेक्षा ठेवून अनेक स्वप्न सजवत असते. काहीजण प्रपोज करून आपलं प्रेम मिळवण्यात यशस्वी होतात तर काहींच्या मनात हे अव्यक्त प्रेम आयुष्याच्या शेवटापर्यंत एका बंद कुपीत अत्तरासारखं दडून राहतं, ना ते संपत, ना ते उडून जातं ना ते बाहेर येतं.

चित्रपटात तुम्ही पाहिलंच असेल हिरो आपल्या प्रेयसीला किंवा हिरोईनला प्रपोज करताना अनेकदा गुडघ्यावर बसतो. पण तुम्ही याला फक्त एक रोमँटिक क्षण म्हणून पाहता पण त्यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला गुडघ्यावर बसून प्रपोज करण्यामागचा इतिहास आणि अर्थ सांगणार आहोत. रिल ते रिअल लाईफ सर्वत्र प्रपोज म्हटलं की गुडघ्यावरच बसायचं ही संकल्पना का रूढ झाली आहे यामागची रंजक कहाणी किंवा इतिहास जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pixels, iStock)

हेही वाचा :  '...तर पुणे बर्बाद होण्यासाठी वेळ लागणार नाही', राज ठाकरेंचा पुणेकरांना इशारा

प्रपोज डे चा रोमांचक इतिहास

प्रपोज डे चा रोमांचक इतिहास

त्या इतिहासाची कहाणी ऐकायची असेल तर पंधराव्या शतकातील युरोपात जावे लागेल. 1477 च्या काळातील ही गोष्ट. जेव्हा असे मानले जाते की ऑस्ट्रियन आर्कड्यूक मॅक्सिमिलियनने या दिवशी मेरी ऑफ बरगंडीला हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज केले होते. नंतर १८१६ मध्ये आणखी एका घटनेने हा दिवस खास बनवला तो म्हणजे राजकुमारी शार्लोट आणि तिचा भावी पती या दिवशी एकत्र आले. तेव्हापासून व्हॅलेंटाईन आठवड्याचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. १९व्या शतकापासून व्हॅलेंटाईन आठवड्यातील हा खास दिवस संपूर्ण युरोपमध्ये खूप लोकप्रिय झाला. जगभरात हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

(वाचा :- Rose Day: चुकूनही देऊ नका बायको व गर्लफ्रेंडला एकाच रंगाचं गुलाब, वाचा प्रत्येक रंगाचा अर्थ मग करा निवड नाहीतर)​

पूर्वापार चालत आलेली रित

पूर्वापार चालत आलेली रित

गुडघ्यावर बसून प्रपोज करणे ही नाइटहूडच्या काळापासूनची म्हणजेच मध्यकालीन युगातून चालत आलेली एक पूर्वापार परंपरा आहे. यावेळी विवाह आणि धर्म यांचा एकमेकांशी फारच जवळचा संबंध होता. अशा परिस्थितीत पुरुषांना गुडघे टेकून त्यांच्या महिला साथीदारांना लग्नाचा प्रस्ताव द्यावा लागत असे, ज्याप्रमाणे एखादा भक्त आदर आणि निष्ठा दाखवण्यासाठी आपल्या स्वामींसमोर किंवा देवतेपुढे गुडघे टेकून नतमस्तक होतो अगदी तसंच काहीशी ही संकल्पना. पण याचा अर्थ काय?

हेही वाचा :  साधेपणा आणि एलिगंट लुक यांचे समीकरण म्हणजे समंथा रूथ प्रभूची स्टाईल, सौंदर्याने केले सर्वांना घायाळ

(वाचा :- लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..)​

गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याचा अर्थ

गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याचा अर्थ

गुडघ्यावर बसून एखाद्याला प्रपोज करणे प्रार्थना, समर्पण, आदर आणि सन्मानाशी संबंधित आहे. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले तर त्यातून केवळ प्रेमच नाही तर त्याच्या मनातील तुमचा आदर आणि त्याच्या आयुष्यातील तुमचे अनन्यसाधारण महत्त्वही दिसून येते.

(वाचा :- आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष)​

कल्चरप्रमाणे बदलते प्रपोज करण्याची पद्धत

कल्चरप्रमाणे बदलते प्रपोज करण्याची पद्धत

जोडीदाराला प्रपोज करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक देशात वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, UAE मध्ये मुलीला प्रपोज करण्यासाठी आधी मुलाला तिच्या आईशी बोलावे लागते. त्याचवेळी, आयरलॅंडमध्ये प्रपोज करण्यासाठी विशेष प्रकारची एक अंगठी निर्माण केली जाते ती प्रियकर किंवा प्रेयसीला घातली जाते.

(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)​

प्रपोज करताना या गोष्टींची घ्या काळजी

प्रपोज करताना या गोष्टींची घ्या काळजी

प्रपोज करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य शब्द आणि भावना निवडता येणे होय. अशा परिस्थितीत काही लोक लाखो रुपये खर्च करून आपल्या जोडीदाराला महागड्या ठिकाणी घेऊन जातात आणि महागडी गिफ्ट्स देऊन प्रपोज करतात. त्याचबरोबर काही लोक असे असतात ज्यांना एकत्र घालवलेल्या आठवणींनी आपली खोली सजवणे आणि आपल्या जोडीदाराला आपल्या मनातील भावना शब्दांतून नाही तर कृतीतून सांगणे आवडते. पण या सर्वात आपल्या आवडीपेक्षा जोडीदाराची आवड जपणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याच्या आवडी पूर्ण न करता आपल्याला जे आवडतं ते करणं म्हणजे त्याला नाराज करण्यासारखं आहे म्हणून या गोष्टीची नक्की काळजी घ्या.

हेही वाचा :  होणाऱ्या पतीसमोरच तरुणीसोबत शारीरिक लगट; मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, तिने हिसका दाखवताच..

(वाचा :- या 5 प्रकारच्या मुलांवर अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करते बायको,नवरा म्हणेल तिच त्यांच्यासाठी पूर्व व पश्चिम दिशा)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …