भाऊरावच्या ‘टीडीएम’ मधील ‘एक फुल’ गाणं प्रदर्शित; पृथ्वीराज आणि कालिंदीचा रोमँटिक अंदाज

TDM Song Ek Phool: एक आगळावेगळा विषय घेऊन ‘टीडीएम’ (TDM Marathi Movie) हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आहेत. भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणी ही या चित्रपटाची खासियत आहे. काही दिवसांपूर्वी  ‘बकुळा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

‘व्हॅलेंटाईन्स वीक’चं औचित्य साधत ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं असून या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार (Vinayak Pawar) यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत. ‘टीडीएम’ चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता ‘एक फुल’ या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर साऱ्यांच्या नजरा चित्रपटातील इतर गाण्यांकडे वळल्या आहेत. मात्र त्यासाठी काही क्षणाचा विलंब लागणार आहे. लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ही ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत, यात शंकाच नाही.

हेही वाचा :  सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट

पाहा गाणं:

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘ स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’  चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत ‘टीडीएम’ चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. 28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

काही दिवसांपूर्वी  ‘टीडीएम’ चे पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटाची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

TDM: ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘टीडीएम’ चं पोस्टर झालं रिलीज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …