प्राजक्ता माळीचं प्रेम आलं समोर, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

आपल्या अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्राजक्ताने प्रेक्षकांना आपलंस केले. फार कमी वेळेत प्राजक्ताने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली कवयित्रीही दिसते. या नवीन वर्षाला प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली. आता प्रत्येक सणाला प्राजक्ता तिच्या दागिन्यांची एक झलक सर्वांसमोर आणते. काल मराठी भाषा गौरव दिन होता. यावेळी प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केले आहे. यावेळी प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी प्रेम म्हणजे वणवा असे सांगत ती कोणत्या कोणत्या गोष्टीवर प्रेम करते ती खास गोष्ट सांगितली आहे. (फोटो सौजन्य :- @prajakta_official)

असा होता प्राजक्ताचा लुक

असा होता प्राजक्ताचा लुक

या खास दिवशी प्राजक्ताने निळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीला सुंदर लाल रंगाचा काठ देण्यात आला होता. या नऊवारी साडीमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. या लुकला पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने पारंपारिक दागिने देखील परिधान केले होते. प्राजक्ताने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नऊवारीतील पारंपारिक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने नाकात नथ आणि पारंपारिक दागिने घातले आहेत. फोटोंमधले अलंकार अर्थातच प्राजक्तराजचे असल्याचं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे.

हेही वाचा :  मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य

(वाचा :- Z+ सिक्युरिटीत अंबानींच्या होणाऱ्या सुनेची पेस्टल लेहंग्यात रॉयल एन्ट्री, त्या कृतीमुळे नेटकऱ्यांना भावला साधेपणा) ​

दागिन्यांची गोष्ट

दागिन्यांची गोष्ट

प्राजक्ताने या साडीवर मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला होता. या नवीन वर्षाला प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली. यावेळी प्राजक्ताने “सोनसळा” हा हार परिधान केला आहे. प्राजक्ताने एका पोस्टमध्ये सांगितले की तिच्या पहिल्या चित्रपटातल्या पहिल्या भूमिकेचं नाव “सोनसळा” होतं त्यामुळे तिने या साखळीला सोनसळा असे नाव दिले आहे.

(वाचा :- दिल्ली क्राईममधील वर्दीतील ऑफिसर ते वनपीसमधील ग्लॅमरस अदा, 49 व्या वर्षी शेफाली शाह अगदी फाईन वाईन)

प्राजक्ताचे प्रेम

प्राजक्ताचे प्रेम

प्राजक्ताने या खास पोस्टमध्ये “प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं.. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं… प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं… मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहिलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”. जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही….. प्राजक्ता माळीने म्हटलं आहे.

(वाचा :- महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या बायकोचा खणाच्या साडीत रॉयल अंदाज, प्रिया मराठेने वेधले सर्वांचे लक्ष)

हेही वाचा :  माझी कहाणी : कधी म्हैस तर कधी हत्ती अशा विचित्र नावाने पती हाक मारतो, माझ्या लठ्ठपणामुळे शरीरच ठरतेय शाप

टिकलीने दिला शाही लुक

टिकलीने दिला शाही लुक

यावेळी प्राजक्ताने लाल रंगाची मोठी टिकली लावली होती. त्याचप्रमाणे या टिकलीच्या खाली छोटी टिकली देखील काढण्यात आली होती. त्यामुळे प्राजक्ताच्या सौंदयामध्ये अजूनच वाढ झाली आहे.

हिरव्या बांगड्या आणि पाटल्यांचा थाट

हिरव्या बांगड्या आणि पाटल्यांचा थाट

या लुकला परफेक्ट करण्यासाठी प्राजक्ताने हिरव्या बांगड्या आणि पाटल्या परिधान केल्या होत्या. या मुळे प्राजक्ताला मराठमोळा लुक मिळण्यास मदत झाला आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …