Holi Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय

Holi Viral Video : सोशल मीडियामुळं (Social Media) कलाकार म्हणू नका किंवा मग नेतेमंडळी, सर्वांनाच व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. अनेकदा काही खासगी कारणांसाठी, अनेकदा सामाजिक कारणांसाठी काही पोस्ट लिहित, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत या माध्यमाचा वापर केला जातो. आजची तरुणाई या सोशल मीडियाच्या जरा जास्तच जवळची. हो… पण यात नेतेमंडळीही मागे नाहीत बरं. कारण, याच माध्यमामुळं राजकारणातील चेहरे त्यांच्या एका वेगळ्या रुपामुळं सातत्यानं चर्चेत असतात. (Amravati MP Navneet rana goes for a bike ride with husband ravi rana in melghat watch video )

 

प्रकाशझोतात असणाऱ्या या नावांपैकी एक म्हणजे अमरावती लोकसभा क्षेत्रातील खासदार नवनीत राणा (Navneet Rana). नवनीत राणा हे नाव राजकीय वर्तुळात नवं नाही किंबहुना त्यांच्या नावाभोवती असणारी चर्चेची आणि वादाची वलयंही कमी नाहीत. अशा राणा या कायमच त्यांच्या वेगळेपणानं नेटकऱ्यांच्या नजरा वळवतात. आदिवासी समुदायाच्या वाड्यापाड्यांवर जाऊन त्यांची भेट घेण्यापासून ते अगदी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या याच नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नुकतीच अशाच काही आदिवासी बांधवांची भेट घेतली. 

हेही वाचा :  Kindey Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम

मेळघाटातून बाईक राईड… (Melghat Maharashtra)

मेळघाटातील या समुदायांची भेट घेण्यासाठी यावेळी राणा दाम्पत्यानं बाईक राईडला पसंती दिली (Navneet Rana Bike Ride). बाईकवरूनच ही दोघं या दौऱ्यावर निघाली आणि पाहता पाहता या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. खुद्द राणा यांनी तो शेअरही केला. जिथं त्यांनी होळी साजरा करण्यासाठी आपण मेळघाटातील खेडोपाडी गेल्याचं सांगितलं. अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं. एका व्हिडीओमध्ये ही जोडी खाद्यपदार्थांचा आस्वास घेत गप्पाही मारताना दिसली. 

मग नेमकं बिनसलं काय? 

नवनीत राणा आणि रवी राणा बाईक राईडला निघाले, तिथं त्यांनी आदिवासींसोबत नृत्यही केलं. पण, या साऱ्यामध्ये नेटकऱ्यांना एक बाब खटकली. ही बाब म्हणजे त्या दोघांनीही या प्रवासाच हेल्मेटचा वापर केला नव्हता. नियम फक्त आम्हालाच का…?, हेल्मेट कुठंय? हे असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली. काहींचं लक्ष बाईवर नंबर प्लेटच नाही याकडेही गेलं. बस्स… मग काय? याच मुद्द्यांवर त्यांच्यावर काहीजणांनी टीकेची झोडही उठवली. समाजापुढे आदर्श प्रस्थापित करणाऱ्या नेतेमंडळींचं हे वागणं तुम्हाला पटलं? 

हेही वाचा :  गिळायच की थुंकायचं! रजनीगंधा टाकून बनवलं आईसक्रिम... व्हिडिओ पाहून लोकं भडकली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …