होळीसाठी बनवा कटाची आमटी सोप्या पद्धतीने, पुरणपोळीला येईल अधिक स्वाद

कटाची आमटी हा पुरणपोळीसह खाण्याचा अविभाज्य भाग आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रीयन घरात हमखास काटची आमटी करण्यात येते. चविष्ट आणि स्वादिष्ट अशी कटाची आमटी सोप्या पद्धतीने बनविण्यासाठी काही खास टिप्स आम्ही देत आहोत.

पुरणपोळीसह कटाची आमटी खाण्याची मजाच काही और आहे. पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार असाल तर सोपी रेसिपी घ्या जाणून. अशा पद्धतीने कटाची आमटी तुम्ही कधीही करू शकता. आदल्या दिवशी ही आमटी करून ठेवली तर ती अधिक चांगली मुरते आणि त्याचा अधिक चांगला स्वाद लागतो. (फोटो सौजन्य – Freepik.com)

कटाची आमटी म्हणजे काय?

कटाची आमटी म्हणजे काय?

पुरणपोळी करताना उरलेल्या चण्याच्या डाळीच्या पाण्यातून आणि पुरणातून ही आमटी तयार करण्यात येते. महाराष्ट्रीयन प्रकार असून तिखट, गोड आणि आंबट चवीची ही आमटी पुरणपोळीसह अत्यंत चविष्ट लागते. होळीच्या वेळी ही आमटी करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

​कटाची आमची करण्यासाठी साहित्य

​कटाची आमची करण्यासाठी साहित्य
 • साधारण पाव वाटी चणाडाळ
 • १ चमचा सुक्या खोबऱ्याचा किस
 • अर्धा चमचा जिरे
 • २-३ काळी मिरी
 • १-२ लवंगा, तमालपत्र, लहानसा दालचिनीचा तुकडा
 • २ चमचा गोडा मसाला
 • १ चमचा चिंचेचा भिजवून ठेवलेला कोळ
 • १ चमचा किसलेला गूळ
 • १ चमचा ओले खोबरे
 • १ चमचा चिरलेली कोथिंबीर
 • चवीपुरते मीठ
हेही वाचा :  Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!

(वाचा – साबुदाण्याच्या खिचडीचा लगदा होऊन चिकटतेय का? अशी बनवा मोकळी खिचडी, सोप्या टिप्स)

फोडणीसाठी लागणारे साहित्य

फोडणीसाठी लागणारे साहित्य
 • २ चमचे तेल
 • २ चमचे मोहरी
 • अर्धा चमचे जिरे
 • चिमूटभर हिंग
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा लाल तिखट
 • ४-५ कडिपत्त्याची पाने

(वाचा – कांदा बारीक चिरता येत नाही का? अजिबात घेऊ नका टेन्शन, सोप्या पद्धतीने होईल २ मिनिटात काम)

कटाची आमटी बनविण्याची पद्धत

कटाची आमटी बनविण्याची पद्धत
 • पुरणाची चणाडाळ ही मऊ शिजवून घ्यावी
 • दुसऱ्या बाजूला गॅसवर खोबऱ्याचा किस, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र हे मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्या
 • थोडं थंड झाल्यावर खलबत्त्यात कुटून त्याची पावडर कराचणाडाळ व्यवस्थित घोटून घ्या
 • एका पातेल्यात तेल गरम होऊ द्या. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट, कडिपत्ता घालून तडतडू द्या आणि मग घोटलेली डाळ मिक्स करा आणि वरून थोडेसे पाणी घाला
 • आमटीला थोडी उकळी येऊ लागल्यावर त्यात वरून गोडा मसाला आणि कुटलेला मसाला मिक्स करा
 • ढवळल्यावर त्यात मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून ढवळावे
 • उकळल्यावर त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालावी
हेही वाचा :  Maharastra Politics : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा

पुरणपोळीसह वाटीत ही आमटी सर्व्ह करावी. त्यात वरून एक चमचा तूप घातल्यास अधिक चांगली चव लागते.

(वाचा – तळलेल्या पुरीत दिसतंय तेल? ऑईल फ्री पुरी दिसण्यासाठी वापरा कमालीच्या ट्रिक्स)

कटाच्या आमटीसाठी खास टीप्स

कटाच्या आमटीसाठी खास टीप्स
 • मसाला आधीच करून ठेऊ नका. ताजा मसाला घातल्यास अधिक चव येते
 • काही जणांना या आमटीत कांदा घालायला आवडतो पण कांद्यापेक्षा अशीच आंबट गोड आमटी अधिक चांगली लागते
 • दालचिनीचे तुकडे वापरायचे नसतील तर तुम्ही दालचिनीची पूडही वापरू शकता.

पुरणपोळी आणि कटाच्या आमटीने करा तुमची होळी आणि रंगपंचमी खास, होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर …

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …