Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीत किंवा कमीही केल्या नाहीत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.34 डॉलर इतके घसरले आहेत. तर कच्चे तेल प्रति बॅरल 73.52 डॉलरने विकले जात आहे. भारतातही 10 जुलैसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेल 70 पैशांनी महागले आहे. तर झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 44 पैशांची वाढ पाहायला मिळत आहे. याशिवाय राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यातही इंधनाचे दर किंचित प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे केरळमध्ये पेट्रोल 72 पैशांनी तर डिझेल 68 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी तर डिझेलच्या दरात 30 पैशांनी घट झाली आहे.

महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर

हेही वाचा :  “एका मृतदेहाऐवजी…”; युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्यासंदर्भात BJP नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

22 मे रोजी शेवटच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आणि तेव्हापासून आजतागायत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास ते वेबसाइटवर अपडेट केले जाते. येथून दररोज लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मिळते.

आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?

देशात इंधनाचे दर कमी होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे कारण हा युक्रेन युद्धानंतर भारताला रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर जी सूट किंवा सवलत मिळत होती ती आता बरीच कमी झाली आहे. दुसरीकडे, या तेलाच्या वाहतुकीसाठी रशियाने ज्या युनिट्सची व्यवस्था केली आहे, ते भारताकडून सामान्यपेक्षा कितीतरी जास्त दर आकारत आहेत. दुसरीकडे, रशिया भारतीय रिफायनरी कंपन्यांना पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या प्रति बॅरल 60 डॉलरच्या किंमतीपेक्षा कमी शुल्क आकारत आहे. पण कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी ते 11 डॉलर ते 19 डॉलर प्रति बॅरल खर्च येत आहे. हे बाल्टिक आणि काळ्या समुद्रातून पश्चिम किनार्‍यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामान्य शुल्कापेक्षा दुप्पट आहे.

हेही वाचा :  कल्याणपुढील प्रवास आता सोपा आणि सुकर होणार; मध्य रेल्वेने दिली Good News



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …