“एका मृतदेहाऐवजी…”; युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्यासंदर्भात BJP नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य


युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार अरविंद बेलाड यांनी युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात.

“विमानात मृतदेह आणण्यासाठी जास्त जागा लागते. मृतदेहासाठी लागणाऱ्या जागेत दहा लोक बसू शकतात आणि ते परत आणता येतात,” असे वक्तव्य बेलाड यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवीनचा मृतदेह युक्रेनमधून परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र त्या देशात युद्ध सुरू आहे, अशा परिस्थितीत त्या लोकांना जिवंत आणणे आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे.

बेलाड हे उत्तर कर्नाटकातील भाजपा नेते आहेत. युक्रेनमध्ये मृत्यू झालेला नवीन हा भारतीय विद्यार्थीही याच भागातील आहे. “शासकीय बाजूने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. पण तिथे युद्ध सुरू आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील आणि शक्य झाल्यास मृतदेह परत आणला जाईल. जे जिवंत आहेत त्यांना आणणे अवघड आहे. त्यामुळे मृतदेह परत आणणे आणखी कठीण आहे. विमानामध्ये मृतदेह आणण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते. मृतदेहासाठी आवश्यक असलेल्या जागेत दहा जणांना बसवून परत आणता येईल,” असे बेलाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :  महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा

The post “एका मृतदेहाऐवजी…”; युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्यासंदर्भात BJP नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …