कोणाचंही नाव न घेता केली टीका
कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं कुणाचंही नाव न घेता अनेकांवर टीका केली. कंगनानं सोशल मीडियावर Xavier मीम्स पासून प्रेरणा घेत ही पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये कंगनानं म्हटलं की, ‘हे वर्ष संपत चाललं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील माझ्या मित्रांना सांगू इच्छिते की, यावर्षी मी ज्यांना ज्यांना दुखावलं आहे. ते त्याच योग्यतेचे होते.’
दरम्यान, शनिवारी कंगना रणौत एकता कपूरनं आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाली होती. पार्टीत सहभागी झालेल्या कंगनानं हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या पार्टीमध्ये करण जोहर आणि तापसी पन्नू देखील सहभागी झाले होते. अर्थात कंगनानं या दोघांशी बोलली की नाही हे माहिती नाही. याआधी कंगनानं करण आणि तापसीवर टीका करणारी पोस्ट शेअर केली होती.
कंगनाच्या कामाबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी तिचा धाकड सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा तिचा पहिला अॅक्शनपट होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आता लवकरच ती इमरजेंसी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः कंगना करत असून त्याचं चित्रिकरण सध्या सुरू आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या