या दोन गोष्टीमुळे 100% कमी होतील डार्क सर्कल, ऋजुता दिवेकर यांना सांगितला रामबाण उपाय

बदललेल्या जीवनशैलीचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. कमी झोप मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त काम करणे आणि बराच वेळ टीव्ही पाहणे यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब करता. डार्क सर्कलमुळे आपण आजारी असल्यासारखे दिसतो.
तुम्ही देखील डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या डागांमुळे हैराण झाले असाल तर बॉलिवूड सेलिब्रिटींचे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. तुम्हालाही काळ्या डागांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. चल तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य :- Istock)

तुळशीचा चहा प्या

तुळशीचा चहा प्या

ऋजुता दिवेकर यांच्या मते, डोळ्यांखाली असलेल्या काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी आले, तुळस, मध आणि केशरचा चहा पेणं हा एक उत्तम उपाय आहे. या चहाचे नियमित सेवन केल्याने केवळ डोळ्यांखालची काळी वर्तुळेच नाही तर डोळ्यांचा थकवा सुद्धा दूर होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला ताजे वाटण्यास मदत होते.

हेही वाचा :  हे तीन फॅट्स तुम्हाला Fat to Fit बनवतील, ऋजुता दिवेकरने सांगितल्या परफेक्ट टिप्स

(वाचा :- सलमानची हिरॉईन भाग्यश्रीने शेअर केली सौंदर्य वाढवणारी भाजीची रेसिपी, काही दिवसातच येईल चेहऱ्यावर) ​

शेंगदाणे आणि गूळ

शेंगदाणे आणि गूळ

आयुर्वेदात शेंगदाणे आणि गूळ या गोष्टीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात की, शेंगदाणे आणि गूळ नारळाच्या तेलात मिसळून खाल्ल्याने डार्क सर्कलपासून सुटका मिळते. यासाठी शेंगदाणे, गूळ आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून खा. संध्याकाळी नाश्त्याच्यावेळी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान खाऊ शकता.

डार्क सर्कलवर रामबाण उपाय

विश्रांती घ्या

विश्रांती घ्या

शरीराच्या वाढीसाठी झोप खूपच महत्त्वाची आहे. ऋजुता दिवेकर सांगतात की, दिवसातून दुपारी अर्धा तास झोपूनही डार्क सर्कलची समस्या दूर होते. म्हणून, दुपारी किमान अर्धा तास तरी विश्रांती घ्या आणि रात्री ११ वाजण्याच्या आधी झोपण्याची सवय लावा.

(वाचा :- उन्हाळ्यात चेहऱ्याला हायड्रेट ठेवायचंय?, या फळाचा वापर करुन मिळवा चमकदार त्वचा, २ मिनिटात चेहरा होईल तुकतुकीत) ​

हे उपाय करून पाहा

Best Food To Remove Dark Circles | how to get rid of dark circle | Maharashtra Times

बेसन आणि ताजे दूध

बेसन आणि ताजे दूध

ऋजुता दिवेकर ज्या व्यक्तींच्या डोळ्याखाली काळी गडद वर्तुळ आहेत अशा व्यक्तींना साबण आणि फेस वॉश टाळण्याचा सल्ला देतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी घरगुती क्लींजर वापरण्यात वापरा असं ही त्या सांगतात. यासाठी ताज्या दुधात बेसनमध्ये मिक्स करूने ते मिश्रण साबण आणि फेस वॉशऐवजी वापरू शकतो. यामुळे डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.हा उपाय तु्म्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता.

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितले ऐन तारुण्यात येणाऱ्या ॲक्ने-पिंपल्सच्या समस्येवरील​​ 3 कारणे​ आणि ​उपाय

(वाचा :- Hair Loss Tips: फक्त 7 दिवसात केस गळती थांबेल, बाबा रामदेव यांनी सांगितले खात्रीशीर उपाय) ​

(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …