ही 5 लक्षणं सांगतात रक्त झालंय दुषित, विषारी घटकांचा कणन् कण बाहेर फेकतात हे 8 पदार्थ

हेल्दी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरातील रक्त सुद्धा हेल्दी व स्वच्छ असणे तितकेच आवश्यक आहे. तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा कळत-नकळत तुमच्या रक्ताच्या निरोगीपणावरही परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या पदार्थांत विविध प्रकारची रसायने आणि तत्व असतात, जे तुमच्या रक्तात हळूहळू विरघळतात. हे विषारी पदार्थ रक्तात शिरून नसांना धोका पोहचवू शकतात, कोलेस्टेरॉलचा धोका वाढवू शकतात, Kidney आणि Liver मध्ये इनफेक्शन निर्माण करू शकतात. अशावेळी प्रश्न निर्माण होतो की रक्त कसे स्वच्छ करावे?

भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांच्या मते, उत्तम आरोग्यासाठी रक्त स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. रक्तातील कोणत्याही प्रकारची घाण तुमच्या बाह्य आणि अंतर्गत अवयवांना हानी पोहोचवू शकते. रक्त स्वच्छ करण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आयर्न, व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्नपदार्थ सेवन केल्याने लाल रक्तपेशींचे अर्थात Red Blood Cells चे उत्पादन वाढण्यास आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत होते. (फोटो सौजन्य :- iStock)

रक्त खराब झाल्याची लक्षणे

रक्त खराब झाल्याची लक्षणे

रक्तामध्ये समाविष्ट असलेले घाणेरडे किंवा विषारी पदार्थ Blood Poisoning होऊ शकते. याचा अर्थ रक्त शुद्ध न केल्यास रक्तामध्ये विषारी पदार्थ तयार होतात आणि अशुद्ध रक्त सर्व अवयवांवर वाईट परिणाम करू शकते. जेव्हा रक्त दुषित होते तेव्हा तुम्हाला अनेक लक्षणे जाणवू शकतात जसे की,

  1. खूप ताप येणे
  2. हृदयाची गती वाढणे
  3. श्वासोच्छवासाची समस्या निर्माण होणे
  4. त्वचेवर लाल खुणा दिसणे
हेही वाचा :  VIDEO : युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्

अशी लक्षणे दिसू लागली की तुम्ही थेट डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.
(वाचा :- पोट, मांडी, कंबरेची चरबी मेणासारखी वितळेल, खा हे 7 नॅच्युरल फॅट बर्नर पदार्थ, पोटात जाताच एक्स्ट्रा फॅट जाळतात)​

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या

ब्रोकोली आणि पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. या गोष्टी लोह आणि कॅल्शियमसोबतच सर्व आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. याचे सेवन केल्याने रक्ताला मोठा फायदा मिळतो. आवश्यक असलेले घातक शरीरात जातात आणि मुख्य म्हणजे रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. ज्यांना अशुद्ध रक्ताची समस्या आहे त्यांनी आवर्जून हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजेत.

(वाचा :- सावधान, फळांसोबत चुकूनही खाऊ नका हे 7 पदार्थ, पोटात बनते अ‍ॅसिडची भयंकर विषारी ज्वाला,किडनी होते कायमची निकामी)​

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस, मनुका आणि मध यांमध्ये आयर्न आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने तुमचे रक्त शुद्ध होते आणि आयर्नची कमतरता टाळता येते. त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास ह्या तिन्ही पदार्थांचे थोडे थोडे मिश्रण रोज सेवन करू शकता. याचा मोठा फायदा तुम्हाला लवकरच दिसून येईल आणि तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

हेही वाचा :  COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?

(वाचा :- TB Cough Symptoms : ज्याला तुम्ही सामान्य खोकला समजता आहात तो TB तर नाही ना? या लक्षणांवरून झटक्यात ओळखा फरक.!)​

व्हीटग्रास ज्यूस

व्हीटग्रास ज्यूस

जर तुम्हाला आधीपासूनच रक्ताशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही व्हीटग्रास ज्यूस नक्की प्यावा. याशिवाय टोफू आणि राजमामध्येही भरपूर प्रमाणात आयर्न असते आणि ते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.
(वाचा :- Foods For Cholesterol: घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात शरीराबाहेर फेकलं जातं, हे 11 पदार्थ करतात रक्त शुद्ध)​

आयुर्वेदिक औषधी

आयुर्वेदिक औषधी

आमलकी आणि गुळवेल किंवा ज्येष्ठमध यांसारख्या औषधी वनस्पतींना आयुर्वेदात मोठे महत्व आहे. त्यांचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. शिवाय आजही अनेक आयुर्वेदिक उपाय त्यांच्या शिवाय अपुरे मानले जातात. तर या औषधी वनस्पती रक्त शुद्ध करण्यास आणि रक्तप्रवाह वाढविण्यास मदत करतात. पण हो त्यांचा थेट वापर करू नये, त्यांचा वापर करण्यासाठी आपण एखाद्या तज्ज्ञाचा वा जाणकाराचा सल्ला अवश्य घ्यावा.

(वाचा :- जास्त स्ट्रेसमुळे मेंदूला जडतो हा गंभीर आजार, Board Exam 2023 च्या आधीच करा डॉक्टरांनी सांगितलेली ही 5 कामे..!)​

हेही वाचा :  लाल साडीत सजली नवरी नताशाच्या सौंदर्याने भारावून गेला हार्दिक, हिंदू पद्धतीने लग्न पडले पार

सफरचंद सुद्धा आहे रामबाण

सफरचंद सुद्धा आहे रामबाण

सफरचंद आणि अव्हाकॅडोसारखी फळे व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न आणि जीवनसत्त्वे यांचा उत्कृष्ट स्रोत मानली जातात. याच्या नियमित सेवनाने रक्तात साचलेली घाण साफ होते. पेक्टिन हा सफरचंदातील फायबरचा एक वेगळा प्रकार आहे जो शरीरातील जड धातू काढून टाकण्यास मदत करतो. व्हिटॅमिन सी सारखे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करतात.
(वाचा :- Joint Muscle Oil : गुडघेदुखी व हाडांतील वेदना 1 रात्रीत होतील गायब, लावा आयुर्वेदिक डॉक्टरांची ही 6 घरगुती तेल)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …