प्रार्थना बेहरे सोशल मीडियावरही प्रार्थना प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आता तिने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट शेअर केली आहे. तिने नेहा कामतच्या रूपातील एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहाला, ‘अभि ना जाओ छोडकर, के दिल अभि भरा नहीं’ असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असं देखील तिने म्हटलं आहे.त्यासोबतच तिने नेहावर भरभरून प्रेम करण्यासाठी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.
तिची ही पोस्ट पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत. या पोस्टवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर ‘आम्ही नेहाला खूप मिस करू’, ‘तुझी आणि परिची खूप आठवण येईल’, ‘तू कायम आमच्या आठवणीत राहशील’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा – Shehnaaz Gill : लालबागच्या दरबारात शहनाज गिल सोबत अनोख्या रुपात दिसला सिद्धार्थ शुक्ला; पाहून तुम्हीही व्हाल EMOTIONAL
झी मराठीच्या एका नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मालिकेचं नाव ‘दार उघड बये’ असं आहे. माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या जागेवर ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. तसेच या मालिकेचे कथानकही हटके असणार आहे, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या